केसांचे गळणे ही एक मोठी समस्या आहे. महिला काय आणि पुरुष काय सगळ्यांचेच केस विरळ आण कमकुवत होत चालले आहेत. केस गळण्यामागे कारणे अनेक आहेत. (hard water side effects, hair loss, The water in your home could be the cause of hair loss. If you use 'this' water, your hair will definitely fall out!)आपण त्यासाठी वेगवेगळे उपायही करुन पाहतो. शाम्पू बदलतो, घरगुती उपाय करतो. डॉक्टरांचा सल्ला घेतो. बरेच काही करतो. तरी अनेकांचे केस गळतातच. केस धुण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना शाम्पू ना कंडिशनर, पाण्याशिवाय केस धुणे शक्य नाही. हे पाणीच जर केसांच्या हानीसाठी कारणीभूत असेल तर?
प्रत्येक गावचं पाणी वेगळं असतं. बारा गावचं पाणी ही अशी वाक्ये आपल्याकडे वापरली जातात. कारण प्रत्येक ठिकाणचे पाणी खरंच वेगळे असते. केसांसाठी सगळीकडचे पाणी चांगले ठरत नाही. प्यायला जरी पाणी अगदी स्वच्छ आणि चांगले असले तरी तेच पाणी केसांसाठी चांगले ठरेलच असे नाही. कामानिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेर गाणी राहणाऱ्यांचे केस फार वेगाने गळायला लागतात. केसातून हात फिरविला तरी पुंजका हातात येतो. केसांची काळजी घेत नाही योग्य आहार घेत नाही अशी कारणे असावीत असे आपल्याला वाटते. मात्र पाणी बदल्यामुळेही केस गळतात. खरे तर पाण्यामुळे केस जास्त गळतात.
आपल्याकडे पाणी जड आहे असे म्हणायची पद्धत आहे. जड पाणी म्हणजेच हार्ड वॉटर. हार्ड वॉटरमुळे केस गळतात. आरोग्यासाठी खनिजे गरजेची असतात. मात्र त्यांचाही अतिरेक चांगला नाही. हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण फारच जास्त असते. ते केसांच्या मुळाशी साठून राहतात. त्यामुळे केस पातळ आणि विरळ होतात. मात्र पाणी जे मिळते ते वापरणे आपल्याला भाग असते. अशावेळी केस चांगले राहावे यासाठी काही उपाय करायला हवेत.
वॉटर सॉफ्टनर नावाचे एक उपकरण मिळते. त्याचा वापर करायला सुरवात करा. पाण्यातील खनिजांचे प्रमाण कमी करण्यासाठी याची मदत होते. क्लॅरिफायिंग शाम्पूचा वापर करायचा. त्यामुळे मुळापाशी साठलेला थर कमी होतो आणि केस गळणे कमी होते. केसांसाठी मॉइश्चराईझिंग हेअर मास्क मिळतात. त्यांचा वापर करायचा. केसांना आर्द्रता आणि पोषण देण्यासाठी त्याचा फायदा होतो. केसांचे गळणे थांबवण्यासाठी विविध उपाय करण्याआधी एकदा पाणी तर अपायकारक ठरत नाही ना याची पडताळणी करुन पाहा.