केस गळणे ही महिला काय पुरुष काय अगदी सगळ्याचीच समस्या झाली आहे. कारणे विविध आहेत त्यावर उपायही विविध आहेत. (hairfall problem? may be you are using wrong comb? Avoid these mistakes while combing your hair)साधे केस विंचरायला घेतले तरी हातात पुंजका येतो. कंगव्यावर नुसते केस लटकत असतात. जिथे उभं राहून केस विंचरता तिथे केसांची रास पडलेली असते. पाहून वाईट फार वाटते. पण अनेकदा असे होते की नक्की केस का गळतात याचे कारण मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे का? केस चुकीचे विंचरल्यानेही गळू शकतात.
केस विंचरताना केस अगदी आरामात तुटतात आणि यामागे अनेक कारणे असतात. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे चुकीची पद्धत वापरणे. केस विंचरताना अनेक जण चुकीच्या पद्धतीने केस विंचरतात. जोरात कंगवा फिरवत उलट्या-सुलट्या दिशेने जोर लावतात. त्यामुळे केस मुळापासून तुटतात आणि त्यामुळे केस गळती वाढते. अनेक जणांना ओले केस विंचरण्याची सवय असते. मात्र केस ओले असताना जोरजोरात विंचरल्यास ते अधिक तुटतात. ओले केस जरा नाजुक असतात. त्यावर कंगवा फिरवल्यावर ते लगेच मुळं सोडतात.
तसेच खूप बारीक किंवा खूप टोकदार दातांचा कंगवा वापरल्यास केसांना दुखापत होते. केस ओढले जातात आणि लगेच तुटतात. स्ट्रेटनर, कर्लिंग आयर्न किंवा ड्रायर यामुळे केस कोरडे होतात, त्यांची नैसर्गिक लवचिकता कमी होते ही उपकरणे वापरल्यावर लगेच केसांतून कंगवा फिरवल्यावर केस सहज तुटतात. पोषणाची कमतरता, प्रथिन, लोह, जीवनसत्वे, आदी घटक शरीरातून कमी होतात. तेव्हा कंगव्यात केस पटकन तुटतात.
ही समस्या कमी करण्यासाठी विंचरायची योग्य वेळ आणि पद्धत महत्त्वाची असते. केस ओले असताना जोरात विंचरू नये, त्याऐवजी केस वाळल्यावर हलक्या हाताने, रुंद दातांच्या कंगव्याने टोकापासून सुरुवात करून हळूहळू टोकापर्यंत विंचरणे योग्य ठरते. चुकीचा कंगवा वापरल्याने केस तुटतात. त्यामुळे आजकाल बाजारात मिळणारे चांगले कंगवेच वापरा. एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. चुकीचा कंगवा वापरणे फार महागात पडू शकते.