Join us

केस तेलकट दिसतात, सतत गळतात? केसांच्या तक्रारींची पाहा कारणं आणि सोपे ३ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2025 15:58 IST

Hair looks oily? See the causes of hair complaints and 3 easy solutions : केस सारखे तेलकट होणे चांगले नाही. काही आजारही असू शकतात. पाहा काय उपाय कराल.

केसांचे आरोग्य खुपच छान होते जेव्हा आजी किंवा आई आपल्या केसांची काळजी घ्यायच्या तेव्हा कसे कसे सुंदर होते ना? रोजच्या रोज गुंता काढून द्यायच्या. सुट्टीच्या आदल्या दिवशी मस्त चंपी करून द्यायच्या. (Hair looks oily? See the causes of hair complaints and 3 easy solutions)झोपही फार शांत लागायची. मग रविवारी वेगवेगळे घरगुती उपाय करून केस स्वच्छ धुऊन द्यायच्या. केसांची घनता तर एकदम मस्त होती. तसेच गळायचेही नाहीत. मात्र आता केस लहानपणी होते तेवढे चांगले राहीले नाहीत. (Hair looks oily? See the causes of hair complaints and 3 easy solutions)ही समस्या तर सर्वांचीच आहे. राहणीमान, सवयी, आवडी, वापरायचे प्रॉडक्ट सगळेच बदल्यावर केसांचे आरोग्यही जरा खराब होते.

केसांना तेल लावणे गरजेचे असते. केसांची वाढ चांगली होण्यासाठी त्यांना तेलाची गरज असते. रोपासाठी खत जसे काम करते तसेच केसांसाठी तेल काम करते. तरी केस तेलकट दिसले की चांगले वाटत नाहीत. म्हणून आपण सुट्टीच्या दिवशी तेल लावतो आणि केस धुऊन टाकतो. मात्र काही जणांचे सकाळी धुतलेले केस संध्याकाळी पुन्हा चिपचिपीत आणि तेलकट होतात. दिसायला घाण दिसतातच मात्र कपाळही तेलकट होते. त्यामुळे खाज सुटते. असे का होते?   

१. हेल्थलाईन तसेच वेबएमडी सारख्या साईट्सवर माहिती उपलब्ध आहे. आर्द्रतेमुळे केस तेलकट होतात. तसेच त्वचाही तेलकट होते. त्यामुळे केसांची काळजी घेणे गरजेचे असते. 

२. आहार चुकीचा घेत असाल तरी केस तेलकट होतात. शरीराच्या प्रत्येक अवयवावर आहाराचा परिणाम होतो. त्यामुळे बऱ्याच आजारांचे तसेच त्रासांचे मुळ हे आहारातच दडलेले असते.  

३.आपण शाम्पू निवडताना बरेचदा फार विचार करत नाही. प्रत्येकाच्या केसांची ठेवण वेगळी असते. त्यामुळे शाम्पूही वेगळा वापरणे गरजेचे असते. स्वत:च्या केसांची ठेवण ओळखून त्यानुसार शाम्पू वापरा.

४. केसांसाठी शिकेकाईच्या पाण्याचा वापर करा. केसासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी गोष्ट म्हणजे शिकेकाई. शिकेकाईच्या शेंगा बाजारात मिळतात. त्या आणून ठेवा. त्या शेंगा पाण्यामध्ये टाकून उकळायच्या. आणि केसांना ते पाणी लावायचे. 

५. कोरफड केसांचा तेलकटपणा कमी करते. ताज्या कोरफडीचा रस करून तो केसांना लावा. विकतच्या रासायनिक कंडीश्नरपेक्षा कोरफड कैकपटीने चांगली असते. 

६. केस जास्त वेळ बांधून ठेवल्यानेही ते तेलकट होतात. प्रदूषण तसेच उन्हापासून केसांचे रक्षण करण्यासाठी आपण केस बांधतो. मात्र ते जास्त वेळ बांधून ठेवत जाऊ नका. 

टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडीप्रदूषणत्वचेची काळजी