Lokmat Sakhi >Beauty > माथ्यावर केस विरळ-टक्कल पडण्याची भीती? १५ दिवसांत केट दाट करण्यासाठी लावा ‘हे’ खास तेल

माथ्यावर केस विरळ-टक्कल पडण्याची भीती? १५ दिवसांत केट दाट करण्यासाठी लावा ‘हे’ खास तेल

Hair Growth Solution : रोजमेरी आणि तांदूळाचं पाणी फक्त १५ दिवस केसांना लावल्यास तुम्ही केसांचं गळणं थांबवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:15 IST2025-08-13T11:39:16+5:302025-08-13T14:15:39+5:30

Hair Growth Solution : रोजमेरी आणि तांदूळाचं पाणी फक्त १५ दिवस केसांना लावल्यास तुम्ही केसांचं गळणं थांबवू शकता.

Hair Growth Solution : Stop Hair Fall With Rosemary Rice And Flaxseeds Water Doctors Advice | माथ्यावर केस विरळ-टक्कल पडण्याची भीती? १५ दिवसांत केट दाट करण्यासाठी लावा ‘हे’ खास तेल

माथ्यावर केस विरळ-टक्कल पडण्याची भीती? १५ दिवसांत केट दाट करण्यासाठी लावा ‘हे’ खास तेल

केस गळणं (Hair Fall) ही गंभीर समस्या आहे. हेअर फॉलचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे लाईफ स्टाईल. होमिओपेथी डॉक्टरांनी केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. डॉक्टर उमंग खन्ना यांनी इंस्टाग्रामवर एक रिल शेअर केली आहे. या व्हिडिओत ते सांगत आहेत की रोजमेरी आणि तांदूळाचं पाणी फक्त १५ दिवस केसांना लावल्यास तुम्ही केसांचं गळणं थांबवू शकता. हा उपाय कसा करायचा पाहा.(Stop Hair Fall With Rosemary Rice And Flaxseeds Water Doctors Advice)

२०० ग्रॅम रोजमेरी पावडर घ्या, ५० ग्रॅम तांदूळ, २ चमचे आळशीच्या बीया, २ ग्लास पाणी. रोजमेरीची पानं केसांना वेगवेगळे फायदे देतात. यात अनेक पोषक तत्व आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे केस चांगले राहण्यास मदत होईल. रोजमेरी इसेंशियल ऑईल केसांचं गळणं कमी करते. तांदूळसुद्धा केसांसाठी फायदेशीर ठरतो. तांदळाच्या पाण्यात इनोसिटोल, व्हिटामीन बी, ई, मॅग्नेशियम आणि अमिनो एसिड्स यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात आणि नैसर्गिक चमक मिळते.(Hair Growth Solution)

एका मोठ्या भांड्यात २०० ग्राम रोजमेरीच्या पानांची पावडर, ५० ग्रॅम तांदूळ आणि २ चमचे आळशीच्या बिया मिसळा. यात २ ग्लास पाणी घाला आणि गॅसवर ठेवून उकळवून घ्या. जेव्हा पाणी १ ग्लास राहील तेव्हा गॅस बंद करा. हे मिश्रण थंड होईल तेव्हा कंटेनरमध्ये ठेवून द्या.

पोटभर खा भात कणभरही पोट सुटणार नाही; तांदूळ शिजवताना ५ गोष्टी करा, शुगर कंट्रोल राहील

रात्रीच्यावेळी एका छोट्या भांड्यात रोजमेरी वॉटर घ्या त्यात कापूस बुडवून स्काल्पच्या चारही बाजूंना लावा. सकाळी तुमचे केस सल्फेट शॅम्पूने वॉश करा. हा उपाय १५ दिवस केल्यास केसांमध्ये नैसर्गिक चमक दिसून येईल आणि केस गळणंही कमी होईल.

Web Title: Hair Growth Solution : Stop Hair Fall With Rosemary Rice And Flaxseeds Water Doctors Advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.