Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > केस पांढरे झालेत-सतत गळतात? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, मजबूत-काळे होतील केस

केस पांढरे झालेत-सतत गळतात? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, मजबूत-काळे होतील केस

Hair Fall Solution Ramdev baba Suggests Home Remedies : सतत केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरल्यामुळे केसाचं नुकसान होतं आणि केस गळू लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 13:18 IST2026-03-22T13:02:05+5:302026-03-22T13:18:41+5:30

Hair Fall Solution Ramdev baba Suggests Home Remedies : सतत केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरल्यामुळे केसाचं नुकसान होतं आणि केस गळू लागतात.

Hair Fall Solution Ramdev baba Suggests Home Remedies For White Hairs And Hair Fall | केस पांढरे झालेत-सतत गळतात? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, मजबूत-काळे होतील केस

केस पांढरे झालेत-सतत गळतात? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, मजबूत-काळे होतील केस

उन्हाळ्याच्या दिवसांत प्रदूषण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे लोकांचे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात. तरूणांमध्ये ही समस्या वेगानं वाढत आहे. ज्यामुळे त्यांना सतत मेहेंदी किंवा हेअर डायचा आधार घ्यावा लागतो. पण सतत केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरल्यामुळे केसाचं नुकसान होतं आणि केस गळू लागतात. (Home Remedies For White Hairs And Hair Fall)

योग गुरू बाबा रामदेव यांनी एक नैसर्गीक उपाय सुचवला आहे. या उपायानं तुम्ही मेहेंदी न लावता केस नैसर्गिकरित्या काळे करू शकता. हा उपाय फक्त केसांना काळे करत नाही तर केसांना मजबूत बनवतो आणि केसांना गळण्यापासून रोखतो. (Hair Fall Solution Ramdev baba Suggests Home Remedies) 

बाबा रामदेव सांगतात आवळा, भृंगराज, शिकेकाई, रिठा आणि मेहेंदीच्या पानांचा हा खास उपाय केसांसाठी गुणकारी ठरतो. एका कढईत थोडं पाणी गरम करून त्यात 2 चमचे आवळा पावडर, एक चमचा भृंगराज पावडर, 1 चमचा शिकेकाई, थोडा रिठा आणि सुकलेली मेहेंदीची पानं घाला.

हे मिश्रण मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं उकळवून थंड होऊ द्या. जेव्हा हे मिश्रण पूर्णपणे थंड होईल तेव्हा गाळून एका बॉटलमध्ये भरा. हे मिश्रण आठवड्यातून 2 ते3 वेळा केसांच्या मुळांना लावून 30 ते 40 मिनिटं तसंच सोडा नंतर सौम्य शॅम्पूनं  केस धुवा. नियमित हा उपाय केल्यास हळूहळू केस काळे होऊ लागतील.

रामदेव बाबांनीकेसांची काळजी घेण्यासाठी आवळ्याचा ज्यूस पिण्याचा आणि त्रिफळा चूर्णाचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. आवळ्यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. त्रिफळातील गुण पचनक्रिया दुरूस्त करतात. ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांचे अवषोशण होण्यास   मदत होते आणि केसांना पोषण मिळते.

बाबा रामदेव सांगतात की  योगा आणि प्राणायम या व्यायाम प्रकारांचा दीनचर्येत समावेश करावा. अनुलोम-विलोम आणि कपालभाती यांसारखे प्राणायम केल्यानं शरीरात ऑक्सिजन वाढते आणि रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. रामदेव बाबांनी सुचवलेला हा घरगुती उपाय सुरक्षित असून याचे कोणतेही साईड इफेक्टस नाहीत. 

Web Title : रामदेव बाबा का सफेद बालों के लिए उपाय: प्राकृतिक रूप से मजबूत, काले बाल।

Web Summary : बाबा रामदेव ने आंवला, भृंगराज, शिकाकाई, रीठा और मेहंदी के पत्तों का उपयोग करके बालों को काला करने, जड़ों को मजबूत करने और बालों के झड़ने को रोकने के लिए एक प्राकृतिक उपाय बताया है। नियमित उपयोग और स्वस्थ जीवनशैली बालों के स्वास्थ्य को बढ़ावा देते हैं।

Web Title : Ramdev Baba's remedy for white hair: Strong, black hair naturally.

Web Summary : Baba Ramdev suggests a natural remedy using Amla, Bhringraj, Shikakai, Reetha, and Mehndi leaves to darken hair, strengthen roots, and prevent hair fall. Regular use and a healthy lifestyle promotes hair health.