lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > फक्त २ चुका, दिवसभरात या २ चुका करणाऱ्यांचे केस हमखास गळतात! बघा, तुम्ही चुकताय का?

फक्त २ चुका, दिवसभरात या २ चुका करणाऱ्यांचे केस हमखास गळतात! बघा, तुम्ही चुकताय का?

हेअरलाईन अधिकच मागे- मागे जात आहे? दिवसेंदिवस जास्त केस गळू लागले आहेत? मग दिवसभरात तुम्ही या दोन चुका तर करत नाही ना, हे एकदा तपासा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 01:19 PM2021-11-15T13:19:18+5:302021-11-15T13:21:20+5:30

हेअरलाईन अधिकच मागे- मागे जात आहे? दिवसेंदिवस जास्त केस गळू लागले आहेत? मग दिवसभरात तुम्ही या दोन चुका तर करत नाही ना, हे एकदा तपासा.

Hair fall: Only 2 mistakes, the hair of those who make these 2 mistakes in a day is definitely falling out! Look, are you missing out? | फक्त २ चुका, दिवसभरात या २ चुका करणाऱ्यांचे केस हमखास गळतात! बघा, तुम्ही चुकताय का?

फक्त २ चुका, दिवसभरात या २ चुका करणाऱ्यांचे केस हमखास गळतात! बघा, तुम्ही चुकताय का?

Highlightsअनेक जणींना ही हेअरलाईन दिवसेंदिवस अधिकच मागे- मागे जात आहे आणि कपाळ मोठे दिसत आहे, असं जाणवू लागतं.

केस गळतीचे प्रमाण आजकाल खूप जास्त वाढले आहे. प्रदुषण, आहार अशा काही बाबतीत हुकले की केस गळणं सुरू होतं असं म्हणतात. पण ज्या महिलांचा प्रदुषणाशी फार काही संबंध येत नाही, ज्यांचा आहारही उत्तम आहे, अशा अनेक जणीही केस गळतीची समस्या जाणवत असल्याचे सांगतात. खूप काळजी घेऊनही तुमचे केस गळणं कमी होत नसेल तर तुमच्या हातून दिवसभरात नक्कीच या २ चुका होत असणार. म्हणूनच तर केसांचं गळणं कमी करायचं असेल, तर या दोन चुका करणं टाळा. 

 

तिशीच्या आसपास पोहोचलेल्या अनेक जणींमध्ये केसगळतीची एक नविनच समस्या जाणवू लागते. ती म्हणजे आपला जो केसांचा मधला भांग असतो त्या भांगाच्या दोन्ही बाजूंना साधारण चार- पाच बोट अंतरावरचे केस जास्त गळत असल्याचं जाणवतं. आपले डोक्याचे कपाळावरचे केस आणि त्वचा यांना जोडणारी जी त्वचा असते त्याला हेअर लाईन म्हणतात. अनेक जणींना ही हेअरलाईन दिवसेंदिवस अधिकच मागे- मागे जात आहे आणि कपाळ मोठे दिसत आहे, असं जाणवू लागतं. अशाप्रकारे जर केस गळू लागले, तर लवकरच आपल्यालाही पुरुषांप्रमाणे टक्कल पडेल की काय, अशी भीतीही वाटू लागते. म्हणूनच मैत्रिणींनो या दोन चुका करणं सोडा आणि केसगळतीची समस्या काही प्रमाणात कमी करा.

साडीला खिसा असता तर! मज्जा, ही घ्या खिसा असलेली साडी, पर्स सांभाळायची कटकट नाही..

 

या दोन चुका टाळा...
१. कायम अंबाडा आणि घट्ट वेणी?

आजकाल वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक जणी घरीच असतात. घरी असल्यावर बहुसंख्य जणींची आवडती हेअरस्टाईल म्हणजे सरळ सगळे केस हातात घ्यायचे, त्यांना पिळ घालायचा आणि गोल- गोल करत केसांचा उंचावर अंबाडा बांधायचा. या अंबाड्याला एक मोठे रबर लावून टाकले की मग कितीही काही झालं तरी केस सुटत नाहीत... तुम्हीही असंच करत असाल, तर ही सवय लगेचच सोडा. कारण आपण जेव्हा असा उंचावर घट्ट अंबाडा घालतो आणि त्याला रबर लावतो, तेव्हा समोरचे, टाळूवरचे आणि भांगाच्या दोन्ही बाजूचे केस खूप ओढले जातात. वारंवार केसांवर जोर येत असल्याने हळू हळू केस तुटत जातात. त्यामुळे मग हेअरलाईनही मागे- मागे सरकत जाते आणि कपाळ मोठे दिसू लागते. म्हणून कायम अंबाडा, किंवा उंचावर घट्ट पाेनी घालणे किंवा मग घट्ट वेणी घालणं टाळा.

बिनधास्त प्या उसाचा रस फुल ग्लास! नॅचरल एनर्जी ड्रिंक, त्वचा आणि तब्येत करतील ग्लो..

 

२. केसातून कंगवा कितीदा फिरवता ?
केसांची वाढ उत्तम होऊ द्यायची असेल, तर त्यासाठी दिवसभरातून १०० वेळा कंगवा केसातून फिरवावा, असा एक विचार खूप जणींनी ऐकलेला असतो. डोक्याच्या त्वचेत उत्तम रक्ताभिसरण होऊन केस वाढण्यासाठी हे गरजेचं आहे, असं त्यामागचं कारण सांगितलं जातं. पण खरोखर डोक्याच्या त्वचेतलं रक्ताभिसरण उत्तम होण्यासाठी केसातून १०० वेळा कंगवा फिरवण्याची गरज नसते. केस नक्कीच दिवसातून दोन वेळा विंचरावे पण त्यासाठी १०० वेळा कंगवा केसातून फिरणे गरजेचे नाही. त्यामुळे केसातून मुळीच एवढ्या वेळा कंगवा फिरवू नका. केस हळूवार आणि सावकाश विंचरा. जोरजोरात किंवा कायमच खूप गडबडीत केस विंचरल्याने केस गळण्याचे प्रमाण वाढते.  

 

Web Title: Hair fall: Only 2 mistakes, the hair of those who make these 2 mistakes in a day is definitely falling out! Look, are you missing out?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.