lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > ऐन तारूण्यात डोक्याला टक्कल पडलं, केस खूप विरळ झाले? जावेद हबीब सांगतात १ घरगुती उपाय; पटकन केस वाढतील

ऐन तारूण्यात डोक्याला टक्कल पडलं, केस खूप विरळ झाले? जावेद हबीब सांगतात १ घरगुती उपाय; पटकन केस वाढतील

Hair Experts Jawed Habib Suggests Home Remedy For Hair Growth : केस मजबूत राहण्यास मदत होते. केस तुटणं, केस गळणं आणि केस गळणं थांबवण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:14 PM2024-04-16T12:14:12+5:302024-04-16T16:24:13+5:30

Hair Experts Jawed Habib Suggests Home Remedy For Hair Growth : केस मजबूत राहण्यास मदत होते. केस तुटणं, केस गळणं आणि केस गळणं थांबवण्यास मदत होते.

Hair Experts Jawed Habib Suggests Home Remedies Dahi And Mulehi Paste Appying on Hairs | ऐन तारूण्यात डोक्याला टक्कल पडलं, केस खूप विरळ झाले? जावेद हबीब सांगतात १ घरगुती उपाय; पटकन केस वाढतील

ऐन तारूण्यात डोक्याला टक्कल पडलं, केस खूप विरळ झाले? जावेद हबीब सांगतात १ घरगुती उपाय; पटकन केस वाढतील

दही आणि ज्येष्ठमध तब्येतीसाठी बरीच फायदेशीर ठरते. (Hair Expert Jawed Habib) याचे सेवन केल्याने इम्यूनिटी स्ट्राँग होण्यास मदत होते. ज्यामुळे आजारांचा धोका कमी होतो. (Beauty Tips) दही आणि ज्येष्ठमध केसांसाठीही फायदेशीर ठरते. दही आणि ज्येष्ठमध अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे केस मजबूत राहण्यास मदत होते. केस तुटणं, केस गळणं आणि केस गळणं थांबवण्यास मदत होते. (Hair Care Tips By Hair Expert Jawed Habib)

आजकाल अनेक ब्रॅण्डस  शॅम्पू आणि कंडिशनर्समध्ये याचा वापर करतात. या दोन पदार्थांची पेस्ट तयार करून तुम्ही केसांना लावू शकतात. ब्युटी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट्स जावेद हबीब यांनी दही आणि ज्येष्ठमध  केसांना लावण्याचे फायदे सांगितले आहेत. जावेद हबीब सांगतात की दही आणि मुलेठीची पेस्ट केसांना लावू शकता. (Tips To Control Hair Fall By Hair Expert Jawed Habib)

पोट कमी करायचंय, डाएट शक्य नाही? फक्त १० रूपयांत मूठभर शेंगदाणे खा-झरझर घटेल वजन

सगळ्यात आधी एक छोटा बाऊल घ्या. २ चमचे ज्येष्ठमधाची पावडर आणि त्याचप्रमाणे दही मिसळा. दही आणि मुलेठीची पेस्ट तयार झाल्यानंतर स्काल्पपासून केसांच्या लांबीला लावा. एक्सपर्ट्सच्यामते दही आणि ज्येष्ठमधाची पेस्ट केसांना लावून अर्धा तास  सुकण्यासाठी ठेवा. ही पेस्ट सुकल्यानंतर  केस माईल्ड शॅम्पूने धुवून घ्या.  केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दही आणि मुलेठीची पेस्ट आठवड्यातून  एकदा केसांना लावा. 

एका बाऊलमध्ये दही आणि मुलेठी पावडर घ्या. आपली पेस्ट हळूहळू स्काल्पवर मसाज करा. ३० मिनिटांनी ही पेस्ट केसांना लावा. त्यानंतर केस शॅम्पू किंवा कंडिशनरने स्वच्छ धुवा. जावेद हबीब सांगतात की ही पेस्ट केसांना लावण्याआधी केसांची व्यवस्थित मसाज करा. यामुळे  केसांना पोषण मिळते. पेस्ट लावणं सोपं होतं. 

जेवण्याची योग्य वेळ, पद्धत कोणती? रामदेव बाबा सांगतात जेवणाचे १० नियम, निरोगी राहाल

केसांना दही आणि ज्येष्ठमधाची पेस्ट लावण्याचे फायदे

एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार दही आणि ज्येष्ठमधामध्ये एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. स्काल्प डिप क्लिन होण्यास मदत होते. दही आणि मुलेठीत एंटी बॅक्टेरीअल गुणधर्म असतात. यातील बॅक्टेरिया आणि डेड स्किन रिमुव्ह होण्यास मदत होते. ज्यामुळे हेअर फॉलिकल्स मजबूत होतात आणि केस गळणं, केस तुटण्याची समस्या  कमी होते. दही आणि मुलेठीत पोषक  तत्व असतात. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. वयाआधीच केस पांढरे होण्याची समस्या असल्यास ही पेस्ट फायदेशीर ठरते. 

दह्यातील लॅक्टिक एसिड पुळ्यांची समस्या दूर करण्यास मदत करते. दही आणि केसांना मजबूत बनवण्याचे काम करते. ज्यामुळे केस गळणं कमी होते. ज्येष्ठमधातील एंटी ऑक्सिडेंट्स केसांना पांढरे होण्यापासून वाचवतात. दही आणि मुलेठी केसांना पोषण देतात आणि केस मऊ-मुलायम होण्यास मदत होते. 

Web Title: Hair Experts Jawed Habib Suggests Home Remedies Dahi And Mulehi Paste Appying on Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.