lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > Hair Care: हेअर वॉशसाठी वापरा रिव्हर्स ट्रिक, शाम्पू करण्याआधी करा ही स्टेप!

Hair Care: हेअर वॉशसाठी वापरा रिव्हर्स ट्रिक, शाम्पू करण्याआधी करा ही स्टेप!

How to wash hair : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, तसेच केसही ड्राय होतात. त्यामुळे ते रूक्ष, कोरडे आणि निस्तेज दिसतात. असं होऊ नये, म्हणून हिवाळ्यात केस धुण्यासाठी रिव्हर्स ट्रिक (reverse method of hair wash) वापरा..  केसांचं होईल अधिक पोषण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 01:17 PM2021-12-05T13:17:57+5:302021-12-05T13:21:45+5:30

How to wash hair : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, तसेच केसही ड्राय होतात. त्यामुळे ते रूक्ष, कोरडे आणि निस्तेज दिसतात. असं होऊ नये, म्हणून हिवाळ्यात केस धुण्यासाठी रिव्हर्स ट्रिक (reverse method of hair wash) वापरा..  केसांचं होईल अधिक पोषण....

Hair Care: Use the reverse trick for hair wash, do this step before shampoo! | Hair Care: हेअर वॉशसाठी वापरा रिव्हर्स ट्रिक, शाम्पू करण्याआधी करा ही स्टेप!

Hair Care: हेअर वॉशसाठी वापरा रिव्हर्स ट्रिक, शाम्पू करण्याआधी करा ही स्टेप!

Highlightsकेस धुण्याची अशी उलट पद्धत नेमकी कशी फॉलो करायची आणि का करायची, याची ही सविस्तर माहिती. 

इतर कोणत्याही ऋतूपेक्षा हिवाळ्यात केसांची आणि त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कारण थंडीमुळे त्वचा डिहायड्रेट होण्याचे प्रमाण वाढते. त्वचेतला ओलावा कमी होऊन त्वचा रूक्ष, कोरडी होते. असंच काहीसं डोक्याच्या त्वचेचंही होतं. डोक्याची त्वचा कोरडी पडल्यामुळे हिवाळ्यात केसात कोंडा होण्याचं प्रमाण खूप वाढतं. कोंडा वाढला की केसदेखील खूपच गळायला लागतात. असं होऊ नये आणि हिवाळ्यातही डोक्याची त्वचा व्यवस्थित हायड्रेटेड रहावी, यासाठी केस धुताना हे रिव्हर्स टेक्निक (reverse method of hair wash) वापरा. यामुळे केसांचं व्यवस्थित पोषण (hair care tips) होईल, असं सौंदर्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 

 

garekarsmddermatologyclinic या इन्स्टाग्राम (instagram) पेजवर केस धुण्याची ही अनोखी पद्धत शेअर करण्यात आली आहे. हेअर वॉश (hair wash) करताना सामान्यपणे आपण केस ओले केल्यानंतर त्यावर आधी शाम्पू (shampoo) करतो आणि मग केस पुन्हा धुवून केसांना कंडीशनर (conditioner) लावतो. पण रिव्हर्स हेअर वॉश पद्धतीमध्ये याच्या बरोबर उलटे आपल्याला करायचे आहे. या हेअरवॉश मध्ये आपल्याला केसांना पहिले कंडिशनर लावायचे आहे आणि त्यानंतर केस धुवायचे आहेत. आता केस धुण्याची अशी उलट पद्धत नेमकी कशी फॉलो करायची आणि का करायची, याची ही सविस्तर माहिती. 

 

रिव्हर्स हेअर वॉश का करायचे?
Why to do reverse hair wash?

- या पद्धतीनुसार असे सांगण्यात आले आहे की जेव्हा आपण केसांना पहिल्यांदा कंडिशनर लावतो तेव्हा केसांवर त्याचा व्यवस्थित कोट चढला जातो आणि त्यामुळे केसांचं डिहायड्रेट होण्यापासून अधिक चांगलं संरक्षण होतं.
- केस धुताना आपण केसांवर जेव्हा पाणी टाकतो, तेव्हा पाण्याच्या पीएच मुळे डोक्याच्या त्वचेचे पोअर्स ओपन होतात. त्यामुळे अशावेळी जेव्हा केसांवर कंडिशनर लावलं जातं, तेव्हा शाम्पूमुळे याच्यावर होणारा थेट परिणाम रोखला जातो. 
- जे केस नाजूक आणि नव्याने आलेले असतात, ते केस शाम्पू लावून कंडिशनर लावल्यामुळे तुटू शकतात. कारण कंडिशनर नंतर केस व्यवस्थित धुतले गेले नाही, तरीही ते या नाजूक केसांसाठी हानिकारक ठरते. पण जेव्हा आपण कंडिशनर आधी लावतो आणि त्यानंतर शाम्पू करतो, तेव्हा या छोट्या, नाजूक केसांवर असलेला कंडिशनरचा थर पुर्णपणे निघून जातो आणि हे नाजूक केस गळून जात नाहीत. 

 

कसं करायचं रिव्हर्स हेअर वॉशिंग?
How to do reverse hair wash?

- सगळ्यात आधी तुमचे केस चांगले ओले करा.
- यानंतर केसांना कंडिशनर लावा. यामध्ये केसांच्या टोकांना कंडिशनरचा कोट व्यवस्थित लावला जाईल, याची काळजी घ्यावी. कारण याच भागातील केसांना डोक्याच्या त्वचेत असलेल्या नॅचरल सेबमचा पुरवठा खूप कमी प्रमाणात होत असतो. त्यामुळे त्यांना कंडिशनरची जास्त गरज असते.
- आता कंडिशनर केसांवर ५ ते १० मिनिटांसाठी राहू द्या.
- त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. 

 

हा आहे रिव्हर्स हेअर वॉशचा फायदा
Benefits of reverse hair wash

- रिव्हर्स हेअर वॉश पद्धत नाजूक, लहान आणि नव्याने आलेल्या केसांसाठी अधिक फायदेशीर आहे. या पद्धतीमुळे अशा केसांचे गळणे खूप कमी होते. त्यामुळे केस दाट होण्यास मदत मिळते. 
- शाम्पूमध्ये खूप अधिक प्रमाणात असणाऱ्या पीएच लेव्हलपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते.
- केसांवर अधिक चांगला परिणाम दिसून येण्यासाठी रेग्युलर हेअर वॉश (regular hair wash) आणि रिव्हर्स हेअरवॉश ही पद्धत आलटून पालटून वापरावी. म्हणजे एकदा रिव्हर्स हेअर वॉश केले तर पुढच्या वेळेला रेग्युलर हेअर वॉश करावे.  

 

Web Title: Hair Care: Use the reverse trick for hair wash, do this step before shampoo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.