आपले केस मोठे आणि दाट (Long And Strong Hairs) असावेत असं प्रत्येकालाच वाटते हेअर केअरसाठी बरेच लोक भरपूर पैसे खर्च करतात. थोडी मेहनत करून तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून लांबसडक, दाट केस मिळवू शकता. मोटीव्हेशनल स्पिकर, कथावाचक जया किशोरी (Jaya Kishori) या त्याच्या साध्या राहणीमानामुळे आणि सौंदर्यामुळेही बऱ्याच चर्चेत असतात. जया किशोरी दाट सुंदर केसांसाठी कोणतेही महागडी उत्पादनं न वापरता घरगुती साहित्याचा वापर करतात. (Hair Care Tips Use This Jaya Kishori)
जया किशोरी केसांची काळजी कशी घेतात?
जया किशोरी आपल्या केसांना एलोवेरा जेल आणि नारळाचं तेल लावतात. एलोवेरा जेलनं केस मुलायम राहण्यास मदत होते आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते. एलोवेरा जेल स्काल्पला पोषण देते ज्यामुळे केस मजबूत आणि दाट होतात. याव्यतिरिक्त जया किशोरी आपल्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी नारळ तेलाचाही वापर करतात. यामुळे केसांना मजबूती मिळते. नारळाचं तेल एका नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते. जर तुमचे केस कोरडे, डॅमेज झाले असतील तर तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता.
नारळाचं तेल आणि एलोवेरा जेल केसांवर कसे वापरावे?
कामा आयुर्वेदाच्या रिपोर्टनुसार एलोवेरा व्हिटामीन्स आणि मिनरल्सनं परीपूर्ण असते. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केसांची वाढसुद्धा होते. नारळाचे तेल केसांना लावल्यानं प्रोटीन लॉस कमी होतो आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते. हे दोन्ही पदार्थ एकत्र केसांन लावल्यास कोंडा कमी होतो, केसांच्या वाढीस चालना मिळते आणि स्काल्प मऊ होतो. २ टेबलस्पून ताजं एलोवेरा १ टेबलस्पून नारळाच्या तेलासोबत मिसळा. ३० मिनिटं हे मिश्रण केसांना लावून ठेवा. नंतर केस स्वच्छ धुवा या उपायानं केसांची वाढ चांगली होते.
केसांना तुम्ही नारळाचं तेल आणि एलोवेरा जेल मिसळून लावू शकता. यासाठी एका वाटीत थोडं नारळाचं तेल घेऊन स्काल्पवर व्यवस्थित मसाज करा. केसांना ४० मिनिटं तसंच राहू द्या नंतर चांगल्या शॅम्पूनं हेअरवॉश करा. हे मिश्रण केसांना नैसर्गिक पोषण देते. ज्यामुळे केसांतील फोड कमी होतात. स्काल्पला मॉईश्चर मिळते आणि नियमित या उपायाचा केसांवर वापर केल्यानं केस दाट, चमकदार होतात.