lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > महिनाभरात वाढतील केस- होतील चमकदार, अभिनेत्री स्मिता शेवाळे सांगतेय तिच्या हेअर केअर टिप्स!

महिनाभरात वाढतील केस- होतील चमकदार, अभिनेत्री स्मिता शेवाळे सांगतेय तिच्या हेअर केअर टिप्स!

Hair Care Tips Shared By Actress Smita Shewale: केस खूपच गळत असतील (hair fall) आणि वाढतच नसतील तर मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने सांगितलेला हा उपाय करून बघा. महिना भरातच छान फरक दिसून येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2023 03:07 PM2023-09-09T15:07:54+5:302023-09-09T15:08:56+5:30

Hair Care Tips Shared By Actress Smita Shewale: केस खूपच गळत असतील (hair fall) आणि वाढतच नसतील तर मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने सांगितलेला हा उपाय करून बघा. महिना भरातच छान फरक दिसून येईल.

Hair care tips shared by actress Smita Shewale, Home remedies for long and strong hair, How to get rid of dandruff? | महिनाभरात वाढतील केस- होतील चमकदार, अभिनेत्री स्मिता शेवाळे सांगतेय तिच्या हेअर केअर टिप्स!

महिनाभरात वाढतील केस- होतील चमकदार, अभिनेत्री स्मिता शेवाळे सांगतेय तिच्या हेअर केअर टिप्स!

Highlights हा उपाय केल्याने केसांतील कोंडा कमी होईल, केसांची वाढ चांगली होईल तसेच त्यांच्यावर चमकही येईल. 

सध्या केसांच्या समस्येने त्रस्त असणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोणाचे केस वाढतच नाहीत, तर कोणाचे खूपच गळतात. काेणाच्या केसांत खूप जास्त कोंडा आहे, तर कोणाचे केस अकाली पांढरे होत आहेत. आपला आहार, वाढलेले प्रदुषण, प्रत्येक गोष्टीत असणारी भेसळ ही काही कारणं आहेतच. पण मुळात जर केसांना योग्य पोषण मिळाले तर त्यांची चांगली वाढ होऊ शकते, हे नक्की (Home remedies for long and strong hair, How to get rid of dandruff?). म्हणूनच केसांना योग्य पोषण कसं द्यायचं, याविषयीचा एक व्हिडिओ अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने शेअर केला असून यात सांगितलेले उपाय महिनाभर केले तरी केसांच्या वाढीत खूप छान फरक दिसून येईल, असं ती सांगतेय. (Hair care tips shared by actress Smita Shewale)

 

केसांची चांगली वाढ होऊन ते चमकदार व्हावेत यासाठी उपाय
ग्रीन टी आणि तांदळाचं पाणी

हा उपाय करण्यासाठी एक कप पाणी घ्या आणि ते एका पातेल्यात टाकून उकळायला ठेवा. त्या पाण्यात एक ग्रीन टी ची बॅग सोडा. बॅगेतल्या ग्रीन टी चा सगळा अर्क पाण्यात उतरून पाण्याचा रंग बदलेपर्यंत ते उकळू द्या.

भात- खिचडी झटपट शिजवली पण कुकरचे झाकण लवकर कसे उघडायचे? २ टिप्स, पटकन जाईल वाफ

नंतर बॅग पाण्यातून काढून टाका आणि पाणी थंड होऊ द्या. आता दुसरीकडे २ ते ३ टेबलस्पून स्वच्छ धुतलेले तांदूळ घ्या. त्यात अर्धा कप पाणी टाकून ते शिजायला ठेवा. तांदूळ जेव्हा ७० ते ८० टक्के शिजतील तेव्हा त्याच्यातलं पाणी काढून घ्या. हे पाणी जेव्हा थंड होईल तेव्हा ते ग्रीन टीच्या पाण्यात एकत्र करा.

 

कसा करायचा वापर?
आता ग्रीन टी आणि शिजवलेल्या तांदळातलं पाणी एकत्र करा आणि ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. स्प्रे बॉटल नसेल तर कापसाच्या बोळ्याने ते पाणी केसांच्या मुळाशी लावा.

G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत

सगळीकडे व्यवस्थित लावलं गेलं की हलक्या हाताने काही ५ ते ७ मिनिटे मसाज करा. नंतर दिड ते दोन तासांनी केस धुवून टाका. हा उपाय केल्याने केसांतील कोंडा कमी होईल, केसांची वाढ चांगली होईल तसेच त्यांच्यावर चमकही येईल. 


 

Web Title: Hair care tips shared by actress Smita Shewale, Home remedies for long and strong hair, How to get rid of dandruff?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.