Lokmat Sakhi >Beauty > डोक्यावर पांढरे केस जास्त चमकताहेत? चमचाभर मेहेंदीत 'हा' पदार्थ मिसळून लावा; काळे होतील केस

डोक्यावर पांढरे केस जास्त चमकताहेत? चमचाभर मेहेंदीत 'हा' पदार्थ मिसळून लावा; काळे होतील केस

Hair Care Tips : केस नैसर्गिकरित्या काळे होण्यासाठी काहीजण हर्बल प्रोडक्ट्सचा वापर करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 08:06 PM2024-06-09T20:06:14+5:302024-06-09T20:09:30+5:30

Hair Care Tips : केस नैसर्गिकरित्या काळे होण्यासाठी काहीजण हर्बल प्रोडक्ट्सचा वापर करतात.

Hair Care Tips : Mix Indigo Powder In Mehendi Heena Turn White Hairs In Black Naturally | डोक्यावर पांढरे केस जास्त चमकताहेत? चमचाभर मेहेंदीत 'हा' पदार्थ मिसळून लावा; काळे होतील केस

डोक्यावर पांढरे केस जास्त चमकताहेत? चमचाभर मेहेंदीत 'हा' पदार्थ मिसळून लावा; काळे होतील केस

आजकाल लोक पांढऱ्या केसांमुळे खूपच त्रस्त आहेत. खराब पाणी आणि केमिकल्सयुक्त शॅम्पू आणि दुसऱ्या उत्पादनांच्या वापरामुळे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात. (Hair Care Tips) पांढरे केस काळे  करण्यासाठी लोक वेगवेगळ्या केमिकल्सयुक्त उत्पादनांचा केसांवर वापर करतात. केस नैसर्गिकरित्या काळे होण्यासाठी काहीजण हर्बल प्रोडक्ट्सचा वापर करतात. (Mix Indigo Powder In Mehendi Heena Turn White Hairs In Black Naturally)

केसांना काळं बनवण्यासाठी तुम्ही मेहेंदीसुद्धा वापरू शकता. मेहेंदीत तुम्ही इंडीगो पावडर मिसळून केसांना लावू शकता. ज्यामुळे केस एकदम दाट आणि काळे होतील. मेहेंदी आणि इंडीगो पावडरचे कोणतेही साईड इफेक्ट्स उद्भवत नाहीत.  या पानांचा केसांवर कसा वापर करावा ते समजून घ्यायला हवं. 

मेहंदी आणि इंडिगो पावडर मिसळून केसांना लावा

तुम्ही नॅच्युरल हर्बल मेहेंदीचा यासाठी वापर करू शकता. आपल्या केसांना मेहेंदी लावा. त्यानंतर त्यात नीलपत्ती म्हणजेच  इंडिगो पावडर मिसळून लावा. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित  मिसळून पाण्याचं एक लिक्वीड तयार करा. ही पेस्ट थोड्यावेळासाठी भिजवून ठेवा. त्यानंतर ही पेस्ट थोड्यावेळासाठी असंच भिजवून ठेवा. मेहंदीप्रमाणे पांढऱ्या केसांना लावा. 

ओटी पोट, मांड्यांचे फॅट कमी होत नाही? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भराभर वजन कमी होईल

मेहंदी आणि इंडीगो पावडरची पेस्ट केसांवर २ तासांसाठी लावून ठेवा नंतर केस व्यवस्थित सुकवा. तुम्ही शॉवर कॅपचा वापरू करू शकता. जेणेकरून त्यावर चांगला रंग चढेल. मेहेंदी लावल्यानंतर केस व्यवस्थित शॅम्पूने धुवून घ्या. ज्यामुळे केसांची एक्स्ट्रा तेल निघून जाईल आणि केसांना चांगला रंग येईल. मेहंदी लावल्याच्या २ तासांनंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. यावेळी तुम्ही शॅम्पूचा वापर करायलाच हवा असं नाही. केस सुकल्यानंतर त्यावर मोहोरीचं तेल लावूननंतर शॅम्पूने केस धुवा. 

नॅच्युरली काळे होतील केस

आठवड्यातून एकदा मेंहंदी लावा. ज्यामुले केस नैसर्गिकरित्या काळे होतील. केसांचा मार्केटचे कलर आणि हानीकारक केमिकल्सपासून बचाव करा. विशेष म्हणजे लाल रंग केसांवर दिसेल. केस एकदम नव्यासारखे काळे दिसतील तुमचे केस पांढरे झालेत असं कोणालाही कळून येणार नाही.
 

Web Title: Hair Care Tips : Mix Indigo Powder In Mehendi Heena Turn White Hairs In Black Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.