lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > Hair Care Tips : केसगळतीला वैतागलेली दिव्यांका त्रिपाठी करते ४ उपाय, केस लांबसडक आणि घनदाट

Hair Care Tips : केसगळतीला वैतागलेली दिव्यांका त्रिपाठी करते ४ उपाय, केस लांबसडक आणि घनदाट

Hair Care Tips :तुम्हीही आपले केस घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 11:32 AM2022-03-31T11:32:54+5:302022-03-31T11:38:37+5:30

Hair Care Tips :तुम्हीही आपले केस घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील.

Hair Care Tips: Divyanka Tripathi gives 4 remedies for hair loss, long hair and thick hair | Hair Care Tips : केसगळतीला वैतागलेली दिव्यांका त्रिपाठी करते ४ उपाय, केस लांबसडक आणि घनदाट

Hair Care Tips : केसगळतीला वैतागलेली दिव्यांका त्रिपाठी करते ४ उपाय, केस लांबसडक आणि घनदाट

Highlights पाणी केवळ त्वचेला हायड्रेटेड ठेवत नाही तर तुमचे केस आणि टाळू देखील आतून निरोगी ठेवते. दिव्यांका वापरत असलेला शाम्पूही कांद्याच्या बियांपासून तयार झालेला असल्याने केसांसाठी तिला याचा फायदा होतो. 

केसगळती, केस पांढरे होणे, केसांत खूप कोंडा होणे या समस्या आपल्यालाच आहेत असे आपल्याला वाटते. पण मोठमोठ्या अभिनेत्रींनाही या समस्या भेडसावतात. सौंदर्यामध्ये केसांचे महत्त्व जास्त असून केस चांगले नसतील तर आपल्या सौंदर्यावर त्याचा परिणाम होतो. अभिनेत्रींच्या बाबतीत तर त्यांची त्वचा, केस हे सगळे नेटके असणे आवश्यक असते. अनेकदा आपले केस पातळ झाले, कोंडा झाला की आपण काही ना काही घरगुती उपाय करतो. त्याचप्रमाणे अभिनेत्रीही आपले केस घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी (Hair Care Tips) सतत काही ना काही घरगुती उपाय करत असतात. प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) तिच्या केसांसाठी काय करते हे आपण पाहणार आहोत. 

(Image : Google)
(Image : Google)

तरुणींसाठी दिव्यांका एक फॅशन आयकॉन आहे. दिव्यांका दिसायला सुंदर आहेच यात वाद नाही. पण तिच्या लांबसडक आणि काळेभोर केसांमुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. आता ती असं काय करते की ज्यामुळे तिचे केस इतके हेल्दी आणि शायनी दिसतात. तर ती अतिशय़ सोपे आणि सहज करता येण्याजोगे काही उपाय करते. ज्यामुळे तिच्या केसांचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. त्यामुळे तुम्हीही आपले केस घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील. पाहूयात दिव्यांका केसांसाठी करत असलेले उपाय.

१. दिव्यांका नियमितपणे बायोटिनयुक्त सप्लिमेंटस घेते. ती सांगते कित्येक तास शूटिंग आणि हिटिंग टूल्समुळे केसांची अवस्था खूपच खराब होते. अशावेळी केवळ हेल्दी डायट उपयोगी नसते तर त्यासाठी तुमच्या शरीराला जास्त पोषण मिळण्याची आवश्यकता असते. सप्लिमेंटसच्या माध्यमातून हे पोषण मिळते. त्यामुळे सप्लिमेंटसचा योग्य त्या सल्ल्याने आहारात समावेश करायला हवा.

२. दिव्यांका आपल्या केसांना डीप कंडिशनिंग करते. केसांचं टेक्शर लक्षात घेऊन ती न चुकता हेअर मास्क लावते. सामान्यत: लोक हेअर वॉश साठी साध्या थंड पाण्याचा वापर करतात पण दिव्यांका मात्र गरम पाण्याने आपले केस धुते आणि कंडिशनिंग झाल्यावर केस थंड पाण्याने धुते. यामुळे केस जास्त शाईन होतात असे दिव्यांका सांगते.

३. तिचे केस खूपच रेशमी, मुलायम आणि शाईनी आहेत. याचे कारण सांगताना ती म्हणते, मी रासायनिक गोष्टी वापरण्यापेक्षा घरगुती उपायांचा वापर कते. कांद्याचा रस आणि ऐलोवेरा जेल यांचे मास्क ती वापरते इतकेच नाही तर दिव्यांका वापरत असलेला शाम्पूही कांद्याच्या बियांपासून तयार झालेला असल्याने केसांसाठी तिला याचा फायदा होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

४. केस चांगले राहण्यासाठी आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे तिच्या हातात नेहमी पाण्याची बाटली असते. याचा परिणाम केवळ त्वचेवरच नाही तर केसांवरही होतो. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी पाणी खूप महत्वाचे असते. पाणी केवळ त्वचेला हायड्रेटेड ठेवत नाही तर तुमचे केस आणि टाळू देखील आतून निरोगी ठेवते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे. 

Web Title: Hair Care Tips: Divyanka Tripathi gives 4 remedies for hair loss, long hair and thick hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.