Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > वय २५ पण चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा ५०, ‘या’ सवयी बदला नाहीतर दिसाल म्हातारे ऐन तारुण्यात

वय २५ पण चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा ५०, ‘या’ सवयी बदला नाहीतर दिसाल म्हातारे ऐन तारुण्यात

Speed aging causes : नकळतपणे पाळल्या जाणाऱ्या काही सवयी तुमच्या आरोग्यासोबतच स्किन हेल्थलाही मोठं नुकसान पोहोचवू शकतात. या सवयी बदलल्या नाहीत, तर त्वचेवर वेळेआधीच एजिंगची चिन्हं दिसू लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:22 IST2026-01-24T12:19:33+5:302026-01-24T12:22:21+5:30

Speed aging causes : नकळतपणे पाळल्या जाणाऱ्या काही सवयी तुमच्या आरोग्यासोबतच स्किन हेल्थलाही मोठं नुकसान पोहोचवू शकतात. या सवयी बदलल्या नाहीत, तर त्वचेवर वेळेआधीच एजिंगची चिन्हं दिसू लागतात.

Habits that speed up aging process improve them to look younger | वय २५ पण चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा ५०, ‘या’ सवयी बदला नाहीतर दिसाल म्हातारे ऐन तारुण्यात

वय २५ पण चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा ५०, ‘या’ सवयी बदला नाहीतर दिसाल म्हातारे ऐन तारुण्यात

Speed aging causes : वेळेआधी त्वचेवर दिसणारी वृद्धत्वाची म्हणजेच म्हातारपणाची लक्षणं अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरतात. ही समस्या होण्याची वेगवेगळी कारणे असतात. आपल्याचा काही कळत-नकळत केलेल्या चुका याला कारणीभूत असतात. पण जर तुम्हालाही प्रीमॅच्युअर एजिंगपासून स्वतःला वाचवायचं असेल, तर काही सवयी वेळेत सुधारणं खूप गरजेचं आहे. नकळतपणे पाळल्या जाणाऱ्या काही सवयी तुमच्या आरोग्यासोबतच स्किन हेल्थलाही मोठं नुकसान पोहोचवू शकतात. या सवयी बदलल्या नाहीत, तर त्वचेवर वेळेआधीच एजिंगची चिन्हं दिसू लागतात. अशात पाहुयात की, कोणत्या सवयी बदलल्या तर ही चिंता दूर होऊ शकते.

पाणी कमी पिणे

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते, ज्यामुळे वयापेक्षा जास्त म्हातारे वाटू शकते. याच कारणाने अनेक स्किन एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. आपण दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवे.

प्रोसेस्ड फूडचं जास्त सेवन

प्रोसेस्ड फूड खाण्याची सवय तुमची त्वचा लवकर म्हातारी दिसण्याचं एक मोठं कारण ठरू शकते. कारण तुमचा आहार थेट तुमच्या त्वचेवर परिणाम करतो. जास्त गोड पदार्थ, पॅक्ड आणि जंक फूड खाल्ल्यामुळे त्वचा आणि केस कोरडे पडतात. परिणामी चेहऱ्यावर तेज कमी होतं आणि तुम्ही वयापेक्षा मोठे दिसू लागता.

नियमित झोप न घेणं

जर तुम्ही रोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेत नसाल, तर याचा वाईट परिणाम केवळ आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही होतो. तज्ज्ञांच्या मते, झोपेची कमतरता असल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागतात. सतत झोपेचा वेळ बिघडत राहिल्यास प्रीमॅच्युअर एजिंगची लक्षणं अधिक वेगाने दिसू शकतात.

शारीरिक हालचालींचा अभाव

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दररोज काही ना काही शारीरिक हालचाल करणं अत्यंत आवश्यक आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारतं, ज्याचा त्वचेला थेट फायदा होतो. याशिवाय जास्त तणाव घेणंही त्वचेच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. सतत तणावात राहिल्यास त्वचेवर लवकर वृद्धत्वाची चिन्हं दिसू लागतात, त्यामुळे शक्य तितकं तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

तणाव आणि चिंता

सतत तणावात राहिल्याने शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. यामुळे त्वचेचं कोलाजेन कमी होतं आणि एजिंगची प्रक्रिया वेगाने होते.

नेहमीच तरूणी दिसण्यासाठी उपाय

हळद आणि खोबऱ्याचं तेल

निरोगी आणि तरूण त्वचेसाठी तुम्ही खोबऱ्याच्या तेलात थोडी हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता. हळदीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगल गुण आढळतात. हे सगळे तत्व त्वचेला आतून निरोगी आणि बाहेरून तरूण बनवतात. रात्री चेहऱ्यावर हळद आणि खोबऱ्याच्या तेलाचा हा फेसपॅक लावू शकता.

कसा कराल वापर?

१ चमचा खोबऱ्याच्या तेलात चिमूटभर हळद पावडर मिक्स करा. याची स्मूद पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर ही पेस्ट लावण्याआधी चेहरा चांगला धुवून घ्या. २० ते २५ मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवावा.

चेहऱ्यावर खोबऱ्याचं तेल आणि हळद लावण्याचे फायदे

या फेसपॅकने त्वचेवर जमा झालेला मळ-धूळ साफ होण्यास मदत मिळते. तसेच या मिश्रणाने त्वचेवरील एक्ने आणि पिंपल्सही दूर होतात. स्कीन टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी हळद आणि खोबऱ्याच्या तेलाचं मिश्रण फायदेशीर ठरतं. तसेच या उपायाने चेहरा तरूण आणि उजळलेला दिसेल.

Web Title : जवान त्वचा के लिए: इन आदतों को बदलकर दिखें हमेशा युवा!

Web Summary : समय से पहले बुढ़ापा जीवनशैली की आदतों के कारण होता है। पानी पिएं, प्रोसेस्ड फूड से बचें, पर्याप्त नींद लें, व्यायाम करें और तनाव कम करें। हल्दी और नारियल तेल का फेस पैक त्वचा को फिर से जीवंत कर सकता है।

Web Title : Reverse Aging: Change These Habits Now for Youthful Skin!

Web Summary : Premature aging is often caused by lifestyle habits. Drink water, avoid processed foods, get enough sleep, exercise, and manage stress. A turmeric and coconut oil face pack can rejuvenate your skin.