Unhealthy Habits of Woman : वाढत्या वयाबरोबर तिचं सौंदर्य कमी होऊ नये आणि चेहऱ्याची चमक कायम राहावी किंवा त्या नेहमीच तरूण दिसाव्यात असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. त्यामुळे अनेक महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारातील वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरतात, पण त्याचे कधी-कधी साइड इफेक्ट्सही दिसून येतात. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या रोजच्या काही सवयीच आपल्याला वेळेआधी म्हातारे दिसायला भाग पाडतात? या सवयी चेहऱ्याची चमक कमी करतात आणि सौंदर्य कमी करतात. चला पाहू या अशाच ५ सवयी ज्या महिलांना वेळेपूर्वी वृद्ध दिसायला लावतात.
अनहेल्दी फूड
आजकाल लोक फळं, हिरव्या भाज्या, डाळी आणि पौष्टिक अन्नापासून दूर जात आहेत. बहुतांश लोक आपल्या आहारात जंक फूड, तेलकट आणि अनहेल्दी पदार्थच खातात. यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो आणि चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसायला लागतात.
शरीरात पाण्याची कमतरता
धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात अनेक महिला पुरेसं पाणी पित नाहीत. यामुळे शरीरात डिहायड्रेशन होतं आणि त्वचा कोरडी पडते. अशात त्वचेवर वयापूर्वीच वृद्धत्वाची चिन्हं दिसू लागतात.
धूम्रपान आणि मद्यपान
धूम्रपान आणि मद्यपानामुळे शरीरावर आणि त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे स्किन एजिंग वेगाने वाढतं आणि शरीरावर वयापेक्षा आधीच वृद्धत्वाचं लक्षण दिसायला लागतं.
झोपेची कमतरता
दररोज किमान ७ ते ८ तास झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. झोपेची कमतरता असल्यास डार्क सर्कल्स, सुरकुत्या आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो कमी होतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणं सौंदर्यासाठी आवश्यक आहे.
ताण
आजकाल वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्यात ताण खूप वाढला आहे. यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन होतं, ज्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो. ताणामुळे त्वचेची चमक कमी होते आणि चेहऱ्यावर लवकर वृद्धत्व दिसू लागतं.
काय कराल उपाय?
असोसिएशन ऑफ न्यूरोकॉगनिटिव अॅन्ड फिजिकल फंक्शनच्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर तुमच्या चालण्याची स्पीड कमी असेल तर तुम्ही वेळेआधीच म्हातारे होऊ शकता. रिसर्चमधून अशीही बाब समोर आली आहे की, जे लोक रोज चांगल्या स्पीडनं वॉक करतात, ते लोक इतरांच्या तुलनेत अधिक तरूण दिसतात. म्हणजे जे लोक रोज वॉक करतात ते वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यास सक्षम असतात.
तसेच आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा. नियमितपणे फळं, हिरव्या भाज्या, डाळी यांचा आहारात समावेश करा. नियमितपणे हलका व्यायाम करा. या गोष्टी करूनही आपण नेहमी तरूण दिसू शकाल. तसेच रोज दिवसभर भरपूर पाणी प्यावे. हेही महत्वाचं आहे.
