आपली त्वचा सुंदर दिसावी असं प्रत्येकाला वाटतं. सुंदर दिसण्यासाठी आपण काय नाही करत. महागडे क्रीम्स, फेसवॉश, अगदी महिन्याला हजारो रुपये पार्लरमध्ये खर्च करतो.(natural beauty secret) पण अनेकदा या केमिकल्सयुक्त उत्पादनांमुळे तात्पुरता फरक पडतो किंवा त्वचेचे नुकसान होते.(magic drink for glowing skin) आपल्या आजी-पणजीच्या काळात अशा क्रीम्स नसायच्या तरीही त्यांची त्वचा इतकी तजेलदार आणि निरोगी असायची. याचं सिक्रेट होत काही घरगुती काढे आणि नैसर्गिक पेयांमध्ये.(pimples reduction home remedy) या घरगुती उपायांमध्ये कोणतेही साइड इफेक्ट नसतात त्यामुळे चेहरा देखील स्वच्छ राहतो. आजी सांगायच्या की चेहऱ्याचं खरं सौंदर्य आतून येतं आणि ते टिकवायचं असेल तर पोट स्वच्छ, रक्त शुद्ध आणि शरीर डिटॉक्स असणं गरजेचं आहे. हा मॅजिक ड्रिंक पिंपल्स कमी करतो, चेहऱ्यावर नैसर्गिक फ्रेशनेस आणतो आणि त्वचेला आतून पोषण देतो. हा मॅजिक ड्रिंक कसा बनवायचा पाहूया.
व्यायाम-डाएट करुनही ढेरी कमी होत नसेल तर रोज खा ५ गोष्टी, सुटलेलं पोट आणि वाढलेली चरबी गायब
हा मॅजिक ड्रिंक पूर्णपणे स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या पदार्थांपासून बनतो. यात जिऱ्याचं पाणी, थोडं धणे, बडीशेप, हळद आणि थोडासा आलेचा रस वापरला जातो. हे सर्व घटक शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात. मॅजिक ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला ओवा, जिरे, बडीशेप प्रत्येकी एक चमचा लागेल. अर्धा दालचिनीचा तुकडा, २ ते ३ लवंगा आणि १ वेलची घ्या.
हे डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला सर्व साहित्य रात्रभर ग्लासभर पाण्यात भिजवावे लागेल. सकाळी हे पाणी मंद आचेवर ५ ते १० मिनिटे उकळून घ्या. नंतर पाणी गाळून घ्या. आपले मॅजिक ड्रिंक तयार होईल. हे पाणी आपण सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकतो. किंवा संध्याकाळी, रात्री झोपण्यापूर्वी प्यायले तरीही चालेल.
आपल्या त्वचेवर पिंपल्स येण्याचे कारण म्हणजे रक्तातील अशुद्धी. हे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. रक्त शुद्ध झाले की त्याचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसतो. दालचिनीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे आपल्या त्वचेच्या आतील संसर्ग कमी करतात. ज्यामुळे पिंपल्स येण्याची समस्या थांबते आणि डाग देखील कमी होतात.
Web Summary : An ancient beauty secret involves a homemade drink for radiant skin. This drink, made with spices like cumin, fennel, and cinnamon, detoxifies the body, purifies blood, and reduces pimples. Drink it on an empty stomach for best results.
Web Summary : एक प्राचीन सौंदर्य रहस्य में चमकदार त्वचा के लिए एक घरेलू पेय शामिल है। जीरा, सौंफ और दालचीनी जैसे मसालों से बना यह पेय शरीर को डिटॉक्स करता है, रक्त को शुद्ध करता है और पिंपल्स को कम करता है। सर्वोत्तम परिणामों के लिए इसे खाली पेट पिएं।