Lokmat Sakhi >Beauty > केसात खुप उवा झाल्या, पावसाळ्यात तर जास्तच? करा आजीच्या काळातले ३ हमखास रामबाण उपाय

केसात खुप उवा झाल्या, पावसाळ्यात तर जास्तच? करा आजीच्या काळातले ३ हमखास रामबाण उपाय

Got a lot of lice in your hair? especially during the monsoon? Try these 3 remedies, home remedies : केसात भरपूर उवा झाल्यावर करा हे उपाय. घरगुती उपायांनी उवा होतील गायब.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 13:59 IST2025-07-15T13:57:25+5:302025-07-15T13:59:22+5:30

Got a lot of lice in your hair? especially during the monsoon? Try these 3 remedies, home remedies : केसात भरपूर उवा झाल्यावर करा हे उपाय. घरगुती उपायांनी उवा होतील गायब.

Got a lot of lice in your hair? especially during the monsoon? Try these 3 remedies, home remedies | केसात खुप उवा झाल्या, पावसाळ्यात तर जास्तच? करा आजीच्या काळातले ३ हमखास रामबाण उपाय

केसात खुप उवा झाल्या, पावसाळ्यात तर जास्तच? करा आजीच्या काळातले ३ हमखास रामबाण उपाय

केसात उवा झाल्यावर खाज येते, आणि सतत डोकं खाजवायची सवय लागते. दिसायला तर ते वाईट दिसतंच पण केसांची आणि डोक्यातील त्वचेची वाट लागते.(Got a lot of lice in your hair? especially during the monsoon? Try these 3 remedies, home remedies ) मोठ्यांपेक्षा लहान मुलांमध्ये उवा होण्याचं प्रमाण अधिक असते, पावसाळ्यात काही महिला आणि पुरुषांनाही उवा होऊ शकतात. मुळात उवा म्हणजे डोक्यात राहणारा एक छोटासा परोपजीवी सजीव आहे.

एक ऊ जरी डोक्यात असेल तर ती भरपूर अंडी देते आणि संख्या वाढवते. उवांची अंडी ज्याला आपण लिखा असे म्हणतो त्या डोक्याच्या मुळाशी चिकटून बसतात आणि काही दिवसांत त्यातून नवीन उवा जन्म घेतात. ही साखळी तुटली नाही, तर उवा वाढत जातात आणि संपूर्ण डोकं व्यापून टाकतात. उवा झाल्यावर काळजी करू नका, कारण उवा घालवण्यासाठी काही पारंपरिक आणि वर्षानुवर्षे वापरले जाणारे घरगुती उपाय आहेत. जे सोपे, नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत.

कडुलिंब वापरणे हा एक जुना आणि प्रभावी उपाय आहे. कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा पेस्ट डोक्यावर लावल्याने उवा मरतात. कडुलिंबाची ही पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुवायचे. यामुळे डोक्यातील उवा आणि त्यांची अंडी दोन्हीही कमी होतात. नारळ तेलामध्ये कडुलिंबाचा रस मिसळून लावल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. 

दुसरा उपाय म्हणजे तिळाचं तेल आणि लसूण. तीळाचे तेल केसांसाठी फायद्याचे असतेच मात्र ते उवा कम करण्यासाठीही उपयुक्त ठरते. लसूण बारीक वाटून तिळाच्या तेलात मिसळून डोक्याला लावल्यास उवा कमी होतात. लसणाचा वास फार उग्र असतो त्यामुळे उवा डोक्यात थांबत नाहीत.

सगळ्यात सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे खोबरेल तेल आणि कपूर असे मिश्रण. रात्री झोपण्यापूर्वी केसांना हे तेल लावून झोपायचे आणि सकाळी केस स्वच्छ धुवायचे. कपूराचा वास उवांना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे कापूर लावणे एकदम मस्त उपाय आहे. 

या सर्व उपायांमध्ये सातत्य खूप महत्त्वाचे आहे. एक-दोन वेळा लावून उपयोग होतोच असं नाही, तर सात ते दहा दिवस हे उपाय करत राहावे लागतात. तेव्हा हळूहळू उवा कमी होतील. डोक्याची नियमित स्वच्छता राखणे, केसांची व्यावस्थित काळजी घेणे गरजेचे असते. 

 तसेच उवा झालेल्या व्यक्तीच्या वापरातील उशी, कंगवा, टोपी हे इतरांनी वापरणं टाळणं आवश्यक आहे. एकाच्या डोक्यात उवा झाल्या की त्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांच्या डोक्यात अंडी देतात. त्यामुळे काळजी घ्यावी. 
 

Web Title: Got a lot of lice in your hair? especially during the monsoon? Try these 3 remedies, home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.