Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > थंडीमुळे चेहरा काळा पडलाय? रात्री किचनमधला 'हा' पदार्थ लावा-सकाळी चेहऱ्यावर येईल तेज

थंडीमुळे चेहरा काळा पडलाय? रात्री किचनमधला 'हा' पदार्थ लावा-सकाळी चेहऱ्यावर येईल तेज

Glowing Skin Tips : हे उपाय  केल्यानं तुम्ही वयाच्या साठीनंतरही पंचविशीतले दिसाल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 23:47 IST2025-11-18T21:13:29+5:302025-11-18T23:47:12+5:30

Glowing Skin Tips : हे उपाय  केल्यानं तुम्ही वयाच्या साठीनंतरही पंचविशीतले दिसाल.

Glowing Skin Tips Vitamin E Oil Glycerin Jojoba Oil Rose Water Apply Your Face Every Night | थंडीमुळे चेहरा काळा पडलाय? रात्री किचनमधला 'हा' पदार्थ लावा-सकाळी चेहऱ्यावर येईल तेज

थंडीमुळे चेहरा काळा पडलाय? रात्री किचनमधला 'हा' पदार्थ लावा-सकाळी चेहऱ्यावर येईल तेज

वाढत्या वयात शरीराबरोबरच चेहऱ्यात बरेच बदल दिसून येतात. त्वचा लूज होऊ लागते. त्वचेची योग्य पद्धतीनं काळजी घेतल्यास तुम्ही त्वचेला वर्षानुवर्ष तरूण ठेवू शकता. त्वचा हेल्दी आणि तरूण दिसण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी काही पदार्थ चेहऱ्याला लावून घ्या (Skin Care Tips). हे पदार्थ चेहऱ्याला लावल्यास त्वचा हायड्रेट, मॉईश्चराईज आणि ग्लोईंग दिसेल. नियमित हा उपाय केल्यास वयाच्या साठीनंतरही चेहरा पंचविशीप्रमाणे दिसेल. (Glowing Skin Tips)

आयुर्वेदीक युनानी चिकित्सा एक्सपर्ट डॉ. सलिम जैदी यांनी त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. डॉ.सलिम जैदी यांच्यामते नैसर्गिक स्वरूपात चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता (Beauty Hacks). हे उपाय  केल्यानं तुम्ही वयाच्या साठीनंतरही पंचविशीतले दिसाल. रोज रात्री चेहऱ्याला काही पदार्थ लावल्यानं त्वचा मॉईश्चराईज, हायड्रेड आणि ग्लोईंग राहण्यास मदत होईल. (Glowing Skin Tips Vitamin E Oil Glycerin Jojoba Oil Rose Water Apply Your Face Every Night )

व्हिटामीन ई ऑईल

व्हिटामीन ई ऑईल एक मॉईश्चरायजर आहे. जे तुम्ही त्वचेला लावता. ज्यामुळे त्वचा सॉफ्ट होते. त्वचेसाठी हे खूपच फायदेशीर ठरते. ज्यामुळे त्वचा मॉईश्चराईज राहते. सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा ग्लोईंग राहते. 

ग्लिसरिन

ग्लिसरिन एक नॅच्युरल मॉईश्चरायजर आहे ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि ग्लोईंग  राहते. जेव्हाही तुम्ही ग्लिसरिन लावाल तेव्हा सुरकुत्या आणि ड्रायनेस कमी होतो.

जोजोबा तेल

जोजोबा तेल मॉईश्चरायजिंग आणि एंटी एजिंग गुणांनी परीपूर्ण असतात. जोजोबा तेल त्वचेसाठी फायदेशीर ठरते. त्यामुले त्वचा मऊ होते आणि सुरकुत्या कमी  होतात त्वचा ग्लोईंग बनते. 

गुलाब जल

गुलाब जल त्वचेसाठी बरेच फायदेशीर ठरते. हे एक प्राकृतिक टोनरच्या स्वरूपात काम करते. त्वचेची पीएच लेव्हल संतुलित ठेवते याशिवाय पोर्स कमी करते. याचे एंटीसेप्टीक आणि एंटी इन्फ्लेमेटरी गुण सुरकुत्या आणि डाग कमी करण्यास मदत करतात.

स्किन क्लिअर मास्क तयार करण्यासाठी एका काचेच्या बॉटलमध्ये १ टेबलस्पून व्हिटामीन ई तेल, १ टेबलस्पून ग्लिसरिन, १ टेबलस्पून जोजोबा तेल एकत्र करा. त्यात २०० एमएल गुलाबपाणी घाला. हे मिश्रण जवळपास ३० ते ४५ दिवस  पुरेल. रात्रीच्या वेळी झोपताना हे लोशन चेहऱ्याला लावा. सकाळी  स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा यामुळे चांगला परीणाम दिसून येईल.

Web Title : चमकती त्वचा के लिए रसोई का सामान: रात में लगाएं, सुबह देखें निखार।

Web Summary : युवा, चमकती त्वचा चाहते हैं? विशेषज्ञ विटामिन ई तेल, ग्लिसरीन, जोजोबा तेल और गुलाब जल रात में लगाने की सलाह देते हैं। यह सरल रूटीन मॉइस्चराइज़ करता है, हाइड्रेट करता है और झुर्रियों को कम करता है, जिससे बाद के वर्षों में भी चमकदार रंगत मिलती है। सर्वोत्तम परिणामों के लिए मिश्रण तैयार करें।

Web Title : Kitchen ingredient for glowing skin: Apply at night, see morning glow.

Web Summary : Want youthful, glowing skin? Experts advise applying vitamin E oil, glycerin, jojoba oil, and rose water nightly. This simple routine moisturizes, hydrates, and reduces wrinkles, revealing a radiant complexion even in later years. Prepare mixture for best results.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.