lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > दांडियाला जायचंय पण मेकअपला वेळच नाही? १० मिनिटांत होईल असा झटपट मेकअप- बघा कसा करायचा

दांडियाला जायचंय पण मेकअपला वेळच नाही? १० मिनिटांत होईल असा झटपट मेकअप- बघा कसा करायचा

Beauty Tips For Quick Makeup: १० मिनिटांत झटपट कसा मेकअप करायचा ते आता पाहूया...(simple and easy tips for makeup)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 02:34 PM2023-10-18T14:34:41+5:302023-10-18T14:35:47+5:30

Beauty Tips For Quick Makeup: १० मिनिटांत झटपट कसा मेकअप करायचा ते आता पाहूया...(simple and easy tips for makeup)

Garba Dandiya Special: How to do attractive makeup in just 10 minutes, Simple makeup in just 4 steps | दांडियाला जायचंय पण मेकअपला वेळच नाही? १० मिनिटांत होईल असा झटपट मेकअप- बघा कसा करायचा

दांडियाला जायचंय पण मेकअपला वेळच नाही? १० मिनिटांत होईल असा झटपट मेकअप- बघा कसा करायचा

Highlightsअशा पद्धतीने मेकअप करण्यासाठी तुम्हाला खूपच कमी वेळ लागेल, शिवाय मेकअपसाठी खूप कॉस्मेटिक्सही लागणार नाहीत

कॉलेज असो किंवा नोकरी असो... आपलं रोजचं रुटीन सांभाळून वेळात वेळ काढून दांडियाला जाणं अवघडच आहे. कधी कधी दांडियाला किंवा इतर कोणत्या कार्यक्रमाला जायला खूपच उशीर होतो आणि मग नेमका मेकअप करायला वेळच मिळत नाही. अशा वेळी खूप वेळ मेकअप करत बसणंही परवडत नाही आणि मेकअप न करता तसंच जाणंही जमत नाही. म्हणूनच अशा धावपळीच्या, गडबडीच्या वेळी झटपट मेकअप कसा करायचा, ते आता पाहूया ( Simple makeup in just 4 steps).. अशा पद्धतीने मेकअप करण्यासाठी तुम्हाला खूपच कमी वेळ लागेल, शिवाय मेकअपसाठी खूप कॉस्मेटिक्सही लागणार नाहीत (How to do attractive, beautiful makeup in just 10 minutes).

 

कमी वेळेत पटापट मेकअप कसा करायचा?

१. क्लिन्झिंग- टोनिंग- मॉईश्चरायझिंग

सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आधी तुमचं नेहमीचं क्लिन्झर किंवा लोशन लावून चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहरा कोरडा करा आणि त्यावर टोनर किंवा गुलाब जल स्प्रे करा. त्यानंतर नेहमीचं मॉईश्चरायझर लावा.

 

२. मेकअप बेस

आता मेकअपचा बेस कसा करायचा ते पाहूया.. यासाठी फाउंडेशन आणि कन्सिलर वापरा. कन्सिलरने डोळ्यांखालची काळी वर्तुळे झाकून घ्या आणि त्यावर तसेच संपूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशनचा एक कोट लावून घ्या.

निळ्या साडीतले मोहक सौंदर्य: दसऱ्याला करा असे ७  मराठी लूक

फाउंडेशन ग्लिटरी शेडचं वापरा. यामुळे चेहऱ्यावर चमक येण्यासाठी पुन्हा शिमर वापरण्याची गरज नाही. तसेच ब्लशर वापरण्याची गरज नाही. 

 

३. ओठांचा मेकअप
चेहऱ्याला माॅईश्चरायझर लावाल तेव्हाच ओठाला लिप बाम लावावा.

आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?

म्हणजे मग ओठांच्या मेकअपची वेळ येईपर्यंत तो ओठांवर व्यवस्थित सेट होईल. आता ओठांवर हलक्या हाताने लायनर लावा आणि मग लिपस्टिकचा शेड लावा. रात्रीच्या वेळी लिपस्टिक ग्लॉसी शेडची निवडा. 

 

४. डोळ्यांचा मेकअप
डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी खूप वेळ नसेल तर फक्त जाडसर लायनर लावा किंवा मग फक्त काजळ लावा. पापण्यांना मस्कारा लावला तरी डोळे छान उठावदार दिसतील. 


 

Web Title: Garba Dandiya Special: How to do attractive makeup in just 10 minutes, Simple makeup in just 4 steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.