गणेशोत्सव (Ganpati Festival) जवळ आला आहे आणि सगळ्यांच्या घरी तयारी सुरु झाली आहे. अशा वेळी, फक्त घरच नाही, तर आपणही सुंदर दिसलं पाहिजे. सणासुदीच्या काळात पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही, म्हणून घरच्या घरी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने फेशियल कसं करायचं (Fecial At Home) हे आपण पाहूया. हेघरगुती फेशियल (fecial At Home) करण्यासाठी तुम्हाला फक्त घरात उपलब्ध असलेल्या गोष्टी लागतील. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर लगेच ग्लो येईल आणि तुम्ही गणेशोत्सवासाठी तयार व्हाल.
स्टेप १: क्लीनझिंग
सर्वात आधी चेहरा स्वच्छ करा. यासाठी एका वाटीत एक चमचा दही आणि चिमूटभर हळद घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. दह्यामुळे त्वचा मॉइश्चराइज होईल आणि हळदीमुळे चेहऱ्यावरची घाण निघून जाईल. दोन मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिकरित्या स्वच्छ करेल.
स्टेप २: स्क्रबिंग
चेहरा स्क्रब करण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ घ्या. त्यात गुलाब पाणी मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ३ ते ४ मिनिटं स्क्रब करा. तांदळाचं पीठ एक उत्कृष्ट नैसर्गिक स्क्रब आहे, जे डेड स्किन काढून टाकण्यास मदत करते त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. स्क्रबिंगमुळे तुमच्या चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते आणि चेहरा अधिक उजळ दिसतो.
स्टेप ३: स्टीमिंग
एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या. टॉवेलने आपलं डोकं झाकून चेहऱ्याला वाफ घ्या. यामुळे त्वचेची छिद्रं (pores) उघडतील आणि आतली घाण बाहेर निघून जाईल. ५ मिनिटं वाफ घेणे पुरेसं आहे. वाफेमुळे रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे चेहऱ्याला एक नैसर्गिक चमक येते.
स्टेप ४: फेस पॅक
आता फेस पॅक तयार करा. एका वाटीत एक चमचा बेसन पीठ, अर्धा चमचा चंदन पावडर आणि थोडं दूध किंवा दही घ्या. याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. हा पॅक १५ मिनिटं चेहऱ्यावर राहू द्या. पूर्ण वाळल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. हा पॅक त्वचेवरील डाग कमी करून चेहरा अधिक नितळ बनवतो.
स्टेप ५: टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग
फेशियलच्या शेवटी चेहरा टोन करा. यासाठी गुलाब पाणी (rose water) एका स्प्रे बॉटलमध्ये घेऊन चेहऱ्यावर स्प्रे करा. त्यानंतर, तुमचं नेहमीचं मॉइश्चरायझर लावून मसाज करा. हे सोपे फेशियल तुम्हाला गणेशोत्सवात नैसर्गिक आणि चमकदार लूक देईल. फेशियल केल्यानंतर 2 दिवस चेहऱ्याला साबण लावू नका. ज्यामुळे सॉफ्टनेस टिकून राहील.