Fungal Acne In Monsoon : हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, पावसाळ्यात त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. चेहऱ्यावर पिंपल्स येणं ही तर एक कॉमन समस्या आहे. पण पावसाळ्यात चेहऱ्यावर होणारी आणखी एक कॉमन समस्या म्हणजे 'फंगल अॅक्ने'. पण जास्तीत जास्त महिला या समस्येला सामान्य पिंपल्सची समस्या समजतात. मुळात पिंपल्स आणि फंगल अॅक्ने दोन वेगवेगळ्या समस्या आहेत. याबाबत डर्मेटोलॉजिस्टनी माहिती दिली आहे.
डर्मेटोलॉजिस्टनी डॉ. अमित बांगिया सांगतात की, फंगल अॅक्ने आणि पिंपल्स दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यांची कारणं आणि लक्षणंही वेगळी असतात. तसेच यावरील उपायही वेगळे असतात.
फंगल अॅक्ने आणि पिंपल्समध्ये फरक
डॉक्टरांनी अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं की, सामान्य पिंपल्स बॅक्टेरिया आणि क्लोस्ड पोर्स म्हणजे बंद रोमछिद्रांमुळे होतात. तर फंगल अॅक्ने यीस्ट नावाच्या Malassezia फंगसमुळे जास्त वाढतात. त्यासोबतच सामान्य पिंपल्स कपाळावर, नाकावर आणि हनुवटीवर जास्त असतात, तर फंगल अॅक्ने चेहऱ्यासोबतच पाठीवर, छातीवरही असतात. फंगल अॅक्नेमध्ये बारीक बारीक पुरळ येते, ज्या खाजवतात.
फंगल अॅक्नेची लक्षणं
पिंपल्समध्ये हलकी सूज आणि वेदना होऊ शकतात. पण फंगल अॅक्नेमध्ये खाज आणि जळजळ जाणवते. तसेच फंगल अॅक्ने कमजोर इम्यूनिटी असलेल्यांमध्ये अधिक आढळतात.
फंगल अॅक्नेवर उपाय
नॉर्मल अॅक्ने म्हणजेच पिंपल्स आणि फंगल अॅक्ने यांच्या उपचारात बराच फरक असतो. पिंपल्स साधारणपणे पॅरॉक्साइड किंवा सॅलिसिलिक अॅसिडसारख्या प्रॉडक्टने ठीक केले जाऊ शकतात. तेच फंगल अॅक्नेची समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यांनी अॅंटी-फंगल क्रीम किंवा औषधं घेतली जाऊ शकतात.
फंगल अॅक्नेपासून बचाव
पावसाच्या दिवसांमध्ये फंगल अॅक्नेची समस्या अधिक बघायला मिळते. यावर काही सोपे उपाय केले जाऊ शकतात. ही समस्या टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घ्या. तसेच असे कपडे वापरा जे हलके असतील आणि हवेशीर असतील. गरज पडली तर अॅंटी-फंगल पावडर किंवा लोशनही लावू शकता. तसेच आंघोळीसाठी माइल्ड अॅंटी-सेप्टिक साबण वापरू शकता.