Join us  

Frontside Hair Loss : कपाळ मोठं दिसू लागलंय का? टक्कल पडण्याचं लक्षण तर नाही हे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:57 PM

Frontside Hair Loss : ही स्त्रियांसह पुरुषांमध्ये आढळणारी समस्या आहे. पुरुषांचे केस प्रामुख्याने समोर किंवा टाळूच्या मध्यभागी गळू लागतात. केसगळतीची ही पद्धत बहुतेक पुरुषांमध्ये दिसून येते. तर बहुतेक स्त्रियांच्या डोक्यावरून एकाच वेळी केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात.

समोरचे केस गळायला लागले तर हळूहळू टक्कल पडायला सुरूवात होते. म्हणूनच केसांच्या आरोग्याकडे वेळोवेळी लक्ष देत राहणं  गरजेचं आहे. जर डोक्याच्या पुढच्या बाजूचे केस कमी दिसत असतील किंवा केस गळणं अचानक वाढले असेल तर अशी कोणतीही स्थिती तुम्हाला टक्कल पडण्याच्या दिशेने ढकलू शकते. (How to stop Hair fall)

समोरचे केस पातळ होणं ही सामान्यतः स्त्रियांसह पुरुषांमध्ये आढळणारी समस्या आहे. पुरुषांचे केस प्रामुख्याने समोर किंवा टाळूच्या मध्यभागी गळू लागतात. केसगळतीची ही पद्धत बहुतेक पुरुषांमध्ये दिसून येते. तर बहुतेक स्त्रियांच्या डोक्यावरून एकाच वेळी केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. इतर अनेक लक्षणे आणि पद्धतींसह टाळूवर केस गळणे तुम्हाला टक्कल पडण्याच्या दिशेने ढकलू शकते.

तरुणांमध्ये केस गळण्याच्या समस्येचे कोणतेही एक कारण नाही. कारण तरुणांमध्ये तणावाचे प्रमाण वाढण्याबरोबरच त्यांच्या खाण्याच्या सवयीही जुन्या पिढीपेक्षा वेगळ्या झाल्या आहेत आणि शारीरिक हालचालीही कमी झाल्या आहेत. अशा स्थितीत लहान वयातच शरीरात अशा समस्या दिसू लागल्या आहेत, ज्या वयाच्या पन्नाशीनंतर दिसू लागल्या होत्या. समोरून केस गळण्याची समस्या प्रामुख्याने अनुवांशिक कारणांमुळे असते. तथापि, व्हिटॅमिन ए, प्रोटीनची कमतरता, जास्त ताणतणावामुळे पुरुषांमध्‍ये समोरील बाजूचे केस गळणे देखील वाढू शकते.

टक्कल पडण्याची कारणं

१) अनुवांशिक कारण

२) वृद्धत्व

३) कोणताही जुनाट आजार

४) गर्भधारणेमुळे होणारे हार्मोनल बदल

५) रजोनिवृत्ती

६) व्हिटॅमिन बीची कमतरता

७) कर्करोग केमोथेरपी

7) तणाव आणि नैराश्य

केसांचा प्रथम कोरडेपणा आणि नंतर सतत कमकुवत होणे आणि पातळ होणे, त्यानंतर झपाट्याने गळणे, हा केस गळण्याचा सर्वात सामान्य प्रकार आहे, जो स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये समान रीतीने दिसून येतो. यामध्ये केस सतत पातळ होऊ लागतात. पुरुषांमध्ये, कपाळावरून केस सलगपणे गायब होऊ लागतात. तर त्याच वेळी, महिलांमध्ये केस गायब झाल्यामुळे केशरचना रुंद होते.

काही लोकांच्या डोक्याचे केस नाण्यांच्या आकाराच्या पॅचमध्ये नाहीसे होऊ लागतात. सुरुवातीला हे पॅचेस खूप लहान असतात आणि नंतर हळूहळू त्यांचा आकार वाढू लागतो. केसगळतीचा हा प्रकार सहसा फक्त टाळूमध्येच दिसून येतो. परंतु काही प्रकरणांमध्ये, दाढी किंवा भुवयांमध्येही अशा प्रकारे केस गळायला लागतात आणि जागा तयार होते.  जेव्हा या पॅटर्नमध्ये केस गळायला लागतात, तेव्हा काही प्रकरणांमध्ये, केस गळण्यापूर्वी तुमची त्वचा खाज सुटू शकते किंवा वेदना जाणवू शकते. यानंतर, हळूहळू या भागाचे केस पॅचच्या स्वरूपात नाहीसे होऊ लागतात.

उपाय

केस जाड आणि मजबूत ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली आणि योग्य पोषण हा मुख्य मार्ग आहे. जर तुमचे केस झपाट्याने गळत असतील तर त्वचा तज्ज्ञांशी संपर्क साधावा. या दोन्हीमुळे तुमची समस्या दूर होईल.

१) तुमच्या आहारात प्रोटिन्सचा समावेश करा

२) व्हिटॅमिन-डीची चाचणी घ्या आणि त्याची पातळी व्यवस्थित ठेवा.

३) कडधान्य, हिरव्या भाज्या, अक्रोड आणि दूध यांसारख्या गोष्टींचे दररोज सेवन करा.

४) रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला मोहरीच्या तेलाने मसाज करा

५) आठवड्यातून एकदा केसांचा मास्क लावा

६) सौम्य शैम्पूची निवडा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य