समोरुन टक्कल पडणे म्हणजेच कपाळाजवळचे केस कमी होणे किंवा मागे सरकणे ही आजकाल अनेकांना जाणवणारी समस्या आहे. यामागे फक्त वय वाढणे हेच कारण नसून, आपल्या जीवनशैलीशी संबंधित अनेक गोष्टीही तितक्याच जबाबदार असतात. योग्य वेळी कारण ओळखले तर ही समस्या काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. (Forehead looks big, hairline recedes? See the reason for baldness, 3 minor mistakes are dangerous)सर्वात सामान्य कारण म्हणजे आनुवंशिकता. घरात वडील, आजोबा किंवा आईकडील नातेवाईकांमध्ये टक्कल पडण्याची समस्या असेल, तर ती पुढच्या पिढीत दिसण्याची शक्यता जास्त असते. याला वैद्यकीय भाषेत Androgenetic Alopecia असे म्हणतात. या प्रकारात केस हळूहळू पातळ होत जातात आणि कपाळाजवळून मागे सरकतात.
हॉर्मोन्समधील बदल हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. शरीरातील काही हॉर्मोन्स केसांच्या मुळांवर परिणाम करतात, विशेषतः DHT (डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन) नावाचा हॉर्मोन. यामुळे केसांच्या वाढीचा कालावधी कमी होतो आणि केस लवकर गळू लागतात. तणाव हा आजच्या काळातील वाढता विषय आहे. सततचा मानसिक ताण, चिंता किंवा झोपेची कमतरता यामुळे केसांच्या मुळांना पुरेसा पोषण मिळत नाही. परिणामी केस गळणे वाढते आणि पुढील भागात टक्कल दिसू लागते.
अयोग्य आहार देखील यामागे कारणीभूत ठरतो. प्रथिने, लोह, व्हिटामिन बी१२ आणि इतर आवश्यक पोषक घटकांची कमतरता असल्यास केस कमकुवत होतात. फास्ट फूड, जंक फूड यांचा जास्त वापर आणि हिरव्या भाज्या, फळे यांचा अभाव यामुळे केसांची गुणवत्ता कमी होते. केसांवर रासायनिक पदार्थांचा अतिवापर हे ही एक कारण आहे. वारंवार केमिकल ट्रीटमेंट्स, हेअर कलर, स्ट्रेटनिंग किंवा जास्त उष्णतेने स्टायलिंग केल्याने केसांच्या मुळांना हानी पोहोचते. त्यामुळे केस गळणे वाढते आणि पुढील भाग लवकर रिकामा दिसू लागतो. काही वेळा आजार किंवा औषधांचे साइड इफेक्ट्सही केस गळण्यास कारणीभूत ठरतात. थायरॉईड समस्या, अॅनिमिया किंवा काही औषधांमुळे केसांची वाढ थांबू शकते.
अगदी सामान्य आणि लक्षात न येणार कारण म्हणजे केस घट्ट बांधणे. घट्ट बांधलेले केस दिसतात सुंदर आणि आरामदायी वाटतात. मानेवर हुळहुळत नाहीत. मात्र अति घट्ट केस बांधले की त्यामुळे केस मागच्या दिशेला ओढले जातात. त्यामुळे केस तुटतात आणि कपाळ मोठं दिसायला लागतं. त्यामुळे केस जरा सैल बांधा . अगदी घट्ट ताणून केस मागे ओढू नका. ताणले जाणार नाहीत याची काळजी घ्या.
Web Summary : Baldness isn't just age-related; genetics, hormones, stress, poor diet, and harsh hair treatments contribute. Tying hair too tightly also causes hair loss. Addressing these factors can help.
Web Summary : गंजापन सिर्फ उम्र से संबंधित नहीं है; आनुवंशिकी, हार्मोन, तनाव, खराब आहार और कठोर बालों के उपचार योगदान करते हैं। बालों को बहुत कसकर बांधने से भी बाल झड़ते हैं। इन कारकों को संबोधित करने से मदद मिल सकती है।