Join us

त्वचा कायम नितळ- तजेलदार दिसायला हवी तर रोज खा ३ गोष्टी, मेकअपची गरजच नाही-आहारतज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2024 10:35 IST

For good glowing skin follow 3 diet tips : त्वचा छान राहावी यासाठी आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा.

आपली त्वचा छान नितळ आणि उजळ असावी अशी आपली इच्छा असते. मात्र काही ना काही कारणाने त्वचेवर पुरळ, पिंपल्स येतात आणि चेहरा खराब दिसायला लागतो. बरेचदा कमी वयात सुरकुत्या येणे, त्वचा खूप रुक्ष आणि कोरडी दिसणे अशा बऱ्याच समस्या उद्भवतात.मग त्वचा आणि चेहरा चांगला दिसावा यासाठी आपल्याला मेकअपचा आधार घ्यावा लागतो. सतत मेकअप करुन चेहऱ्याची त्वचा खराब होण्याची शक्यताच जास्त असते. तसेच यासाठी वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो (For good glowing skin follow 3 diet tips).

त्यापेक्षा नैसर्गिकरित्या त्वचा चांगली असावी असं वाटत असेल तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. पोषक आहारातून शरीरासोबतच त्वचेचे चांगले पोषण होत असल्याने त्वचा छान राहावी यासाठी आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. या गोष्टी कोणत्या याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शाह पांचाळ काही महत्त्वाच्या टिप्स देतात, पाहूयात...

(Image : Google)

१. अँटीऑक्सिडंटस

अँटीऑक्सिडंटस हा आपल्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असून नितळ त्वचेसाठी आहारात अँटीऑक्सिंडटसचे प्रमाण चांगले असायला हवे. भाज्या, फळे, सुकामेवा यांमध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण भरपूर असल्याने आहारात या पदार्थांचा आर्जून समावेश करायला हवा. दिवसभरात या सगळ्या गोष्टी आहारात भरपूर प्रमाणात जातील याची काळजी घ्या.

२. व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठी अतिशय फायदेशीर  असते. यासाठी आहारात संत्री, पेरू, लिंबू, आवळा यांसारख्या आंबट पदार्थांचा समावेश करायला हवा. पेरुमध्ये संत्र्यापेक्षा २० पट जास्त व्हिटॅमिन सी असते. 

३. दिवसातून ५ वेळा फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश

ऐकायला हे खूप जास्त वाटत असले तरी दिवसभराच्या आहारात भाज्या आणि फळांचा भरपूर समावेश करायला हवा. भाजी, सॅलेड, सूप अशा विविध प्रकारात भाज्यांचा आहारात समावेश होऊ शकतो. याशिवाय ब्रेकफास्टच्या वेळी, दुपारच्या जेवणाच्या आधी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळी फळं आवर्जून खायला हवीत. 

मैदा, साखर, पॅकेट फूड, बेकरी प्रॉडक्ट यांचा आहारातील समावेश पूर्ण बंद करावा. या पदार्थांमुळे इन्शुलिनची पातळी वाढते आणि शरीरातील सिबमची निर्मिती वाढून त्वचा खराब होण्याची शक्यता असते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआहार योजना