अळशीच्या बिया दिसायला लहान असल्यातरी यात बरेच गुणधर्म असतात. अळशीतील पोषक तत्वांमुळे अळशीला सुपरफूड्सचा दर्जा प्राप्त झाला आहे (Flax Seeds For Hairs). या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी एसिड, प्रोटीन आणि फायबर्स असतात यात एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. प्राचीन आयुर्वेदापासून ते मॉर्डन न्युट्रिशनपर्यंत अळशीचे सेवन शरीरासाठी उत्तम मानले जाते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. पचनशक्ती चांगली राहते आणि अळशी हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम मानली जाते. नियमित सेवनानं शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते आणि इम्युनिटी बुस्ट होण्यास मदत होते. (How To Use Flax Seeds For Hairs)
अळशीच्या बिया केसांसाठी कशा वापराव्यात
अळशीच्या बियांमध्ये एँटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन ई असते. जे त्वचेला ग्लोईंग बनवते आणि केस मजबूत बनवते. नियमित आळशीच्या बियांचे सेवन केल्यास सुरकुत्या कमी होतात आणि केस गळणं कमी होतं. अळशीच्या बियांचा हेअर मास्कही खूप फायदेशीर ठरतो.
हेअर मास्क तयार करण्यासाठी अळशीच्या बिया ३ ते ४ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट थेट केसांना लावा. यानं केस मुलायम आणि शायनी होतील. सोबतच केसांना पोषणही मिळेल. अळशीच्या बियांचं तुम्ही जेलही बनवू शकता. यासाठी अळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी कमी आसेवर १५ ते २० मिनिटं उकळवून घ्या.. थंड झाल्यावर गाळून जेल वेगळं करा. हे जेल केसांवर लावल्यास केस मजबूत होतील आणि दाटही होतील.
अळशीच्या बियांचे फायदे
अळशीतील ओमेगा-३ फॅटी एसिड्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात. खराब कोलेस्टेरॉल कमी करतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.
अळशीत फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. गॅसेसची समस्या दूर होते आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. यासाठी सकाळी कोमट पाण्यासोबत अळशीचे सेवन करा ज्यामुळे बरेच फायदे मिळतात.
चपात्या वातड होतात-मऊपणा जातो? कणीक मळताना ५ ट्रिक्स वापरा, ४८ तास मऊ राहतील चपात्या
ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अळशीच्या बिया फायदेशीर ठरतात. यातील फायबर्समुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि क्रेव्हिंग्स कमी होतात ज्यामुळे कॅलरी इन्टेक कमी होतो आणि वजनही कंट्रोलमध्ये राहते.
कोण सांगतं रात्री वरण-भात खाऊन पोट सुटतं? या पद्धतीनं वरण-भात खा, १ इंचही पोट सुटणार नाही
अळशीत ओमेगा-३ फॅटी एसिड्स आणि लिग्रान्स यांसारखे घटक असतात जे मेंदूचे आरोग्य सुधारतात. ज्यामुळे मेमरी पॉवर आणि फोकस वाढवण्यास मदत होते.
Web Summary : Flax seeds, rich in omega-3 and antioxidants, are a superfood for hair. Use as a mask or gel to nourish hair, reduce hair fall, and promote growth. Regular consumption improves skin and heart health.
Web Summary : अलसी ओमेगा-3 और एंटीऑक्सीडेंट से भरपूर है, जो बालों के लिए सुपरफूड है। बालों को पोषण देने, झड़ने से रोकने और विकास को बढ़ावा देने के लिए मास्क या जेल के रूप में उपयोग करें। नियमित सेवन त्वचा और हृदय स्वास्थ्य में सुधार करता है।