वय वाढत जातं तसं सर्वसामान्य महिलांचं सौंदर्य कमी होत जातं. वजन वाढत जातं, चेहऱ्यावरही सुरकुत्या येत जातात. वयानुसार शरीरामध्ये हे बदल होत जाणं अगदी स्वाभाविक आहे. पण अभिनेत्रींच्या बाबतीत मात्र तसं होताना दिसत नाही. त्यांचे वय वाढलं तरी सौंदर्य काही कमी होत नाही. यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत. अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याची, तब्येतीची जशी काळजी घेतात, तशी काळजी घेणं सामान्य महिलांना शक्य होत नाही. सर्वसामान्य महिला अभिनेत्रींएवढा पैसा स्वत:च्या सौंदर्यासाठी खर्च करू शकत नाहीत. स्वत:साठी वेळ देऊ शकत नाहीत. पण थोडासा वेळ काढून व्यायाम करणं आणि आहार जपणं या गोष्टी तर कोणतीही महिला निश्चितच करू शकते. तसंच काहीसं झीनत अमानसुद्धा करतात (fitness tips by actress zeenat Aman). त्यांचं डाएट अगदी काटेकोरपणे त्या पाळतात. याविषयीच त्यांनी शेअर केलेली ही खास माहिती पाहा..(diet plant shared by actress Zeenat Aman)
वयाच्या सत्तरीनंतरही झीनत अमानसारखं सुंदर आणि फिट दिसायचं तर...
झीनत अमान यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या आईने शिकवलेली एक गोष्ट सांगितली आहे आणि आईच्या त्या शिकवणीमुळेच आज त्या एवढ्या मेंटेन आहेत असं म्हणायला हरकत नाही.
'हे' ३ पदार्थ एकत्र करून केसांना लावा, ३ आठवड्यांतच केसांचे सगळे प्रॉब्लेम्स जातील
त्या म्हणतात की आईचा एक फिटनेस मंत्र आहे आणि तो म्हणजे eat small, eat fresh.. कमी खा आणि ताजं खा.. हल्ली बरेच लोक पोटापेक्षा जास्त खातात आणि नंतर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. झीनत अमान यांचा दिवसाची सुरुवातच अतिशय हेल्दी असते. कपभर ब्लॅक टी आणि वाटीभर भिजवलेले बदाम खाऊन त्यांचा दिवस सुरू होतो.
त्यानंतर नाश्त्यासाठी त्या नियमितपणे अव्हाकॅडोचं सलाट, चीज आणि टोस्ट असं घेतात. कधी कधी वेगळा पदार्थ खावा वाटला तर बेसनाचं धीरडं किंवा पोहे खातात. दुपारचं जेवण बऱ्यापैकी हेवी घेण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे पोळ्या, भाजी, डाळ, चटणी असे वेगवेगळे पदार्थ त्यांच्या जेवणात असतात.
दातांना ठणक लागण्यामागची ४ कारणं, थंड- गरम खाताच दात ठणकत असल्यास कशी काळजी घ्यावी?
संध्याकाळी ५ वाजता एक चटपटीत पदार्थ खायला त्यांना खूप आवडतो आणि तो पदार्थ म्हणजे मसाल्यामध्ये हलकेसे परतून घेतलेले मखाना. या पोस्टमध्ये रात्रीच्या जेवणाविषयी त्यांनी काही माहिती दिलेली नसली तरी एका अतिशय आवडीच्या गोड पदार्थाबाबत मात्र त्यांनी सांगितलं आहे. डार्क चॉकलेट त्यांना अतिशय आवडत असून त्याचे दोन घास घेतल्याशिवाय त्यांचा दिवस पुर्ण होत नाही, असं त्या म्हणतात.