Lokmat Sakhi >Beauty > महिन्याभरात केस दाट-लांबसडक होण्यासाठी १ सोपा नॅचरल उपाय, केसगळतीही होईल कमी...

महिन्याभरात केस दाट-लांबसडक होण्यासाठी १ सोपा नॅचरल उपाय, केसगळतीही होईल कमी...

Fast Hair Growth Natural Home made hair Serum : केमिकल्सच्या ट्रिटमेंटस करण्यापेक्षा नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे केव्हाही अधिक फायदेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 12:00 PM2023-11-20T12:00:36+5:302023-11-20T12:04:20+5:30

Fast Hair Growth Natural Home made hair Serum : केमिकल्सच्या ट्रिटमेंटस करण्यापेक्षा नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे केव्हाही अधिक फायदेशीर...

Fast Hair Growth Natural Home made hair Serum : 1 easy natural remedy for long hair within a month, hair fall will also reduce... | महिन्याभरात केस दाट-लांबसडक होण्यासाठी १ सोपा नॅचरल उपाय, केसगळतीही होईल कमी...

महिन्याभरात केस दाट-लांबसडक होण्यासाठी १ सोपा नॅचरल उपाय, केसगळतीही होईल कमी...

केस लांब असले की आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल करता येतात. पण केस लहान असले की मात्र ते मोकळे सोडण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. आपले केस छान वाढावेत असे प्रत्येकालाच वाटते. पण विविध कारणांनी ते वाढतच नाहीत. मग ते वाढण्यासाठी आपण बाजारात मिळणारी वेगवेगळी तेलं लावून पाहतो नाहीतर पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंटस करतो. मात्र त्याचाही म्हणावा तसा उपयोग होतो असे नाही. अनेकदा केस इतके प्रमाणाबाहेर गळतात की ते गळू नयेत म्हणून काय करावे ते आपल्याला कळत नाही. गळाल्याने आणि वाढत नसल्याने केस दिवसेंदिवस पातळ होत जातात. अशावेळी केमिकल्सच्या ट्रिटमेंटस करण्यापेक्षा नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास केसांना कोणताही अपाय होत नाही. यासाठी घरच्या घरी सिरम कसे तयार करायचे ते पाहूया (Fast Hair Growth Natural Home made hair Serum)...

१. एक कांदा घेऊन त्याचा मिक्सरमधून रस काढायचा. 

२. रात्रभर एका बाऊलमध्ये मेथ्या आणि एका बाऊलमध्ये तांदूळ भिजत घालायचे. सकाळी त्याचे पाणी कांद्याच्या रसात मिसळायचे. 

३. यामध्ये २ व्हिटॅमिन इ कॅप्सूल आणि थोडे खोबरेल तेल घालायचे.

४. हे मिश्रण चांगले एकजीव करायचे. 

(Image : Google)
(Image : Google)

५. इंजेक्शन सिरींजमध्ये हे मिश्रण घेऊन केसांतील गुंता काढून केसांच्या मुळांशी सिरींजने हे मिश्रण सगळीकडे लावायचे.

६. मिश्रण लावल्यानंतर हलक्या हाताने केसांना मसाज करायचा. 

७. साधारण २ तास हे मिश्रण केसांवर तसेच ठेवायचे आणि नंतर शाम्पू आणि कंडीशनरने केस धुवून टाकायचे.

८.  किमान १५ दिवसांतून एकदा हा उपाय अवश्य करायचा. 

९. यामुळे केस गळती तर कमी होतेच पण केस वाढण्यासही याचा चांगला उपयोग होतो. 

१०. यातील सर्व घटक नैसर्गिक असल्याने केसांवर त्याचा कोणताही इतर परीणाम होत नाही. 


 

Web Title: Fast Hair Growth Natural Home made hair Serum : 1 easy natural remedy for long hair within a month, hair fall will also reduce...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.