Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > स्वयंपाकघरातील या २ गोष्टी एका मिनिटांत लावा चेहऱ्याला, कुठल्याही महागड्या क्रीमपेक्षा जास्त चमकेल चेहरा

स्वयंपाकघरातील या २ गोष्टी एका मिनिटांत लावा चेहऱ्याला, कुठल्याही महागड्या क्रीमपेक्षा जास्त चमकेल चेहरा

Skin Care : आपल्याला जर आपली त्वचा ग्लोईंग करायची असेल, तर डॉक्टरांनी सांगितलेल्या किचनमधील दोन गोष्टींचा सहजपणे वापर करू शकता. त्या कोणत्या हे जाणून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:35 IST2026-01-28T16:42:58+5:302026-01-28T17:35:59+5:30

Skin Care : आपल्याला जर आपली त्वचा ग्लोईंग करायची असेल, तर डॉक्टरांनी सांगितलेल्या किचनमधील दोन गोष्टींचा सहजपणे वापर करू शकता. त्या कोणत्या हे जाणून घेऊया.

Famous doctor revels how to get Korean glass skin | स्वयंपाकघरातील या २ गोष्टी एका मिनिटांत लावा चेहऱ्याला, कुठल्याही महागड्या क्रीमपेक्षा जास्त चमकेल चेहरा

स्वयंपाकघरातील या २ गोष्टी एका मिनिटांत लावा चेहऱ्याला, कुठल्याही महागड्या क्रीमपेक्षा जास्त चमकेल चेहरा

Skin Care : अलिकडे महिला असो वा पुरूष सगळ्यांनाच चेहऱ्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. काळे डाग, चट्टे, पुरळ या समस्या चेहऱ्याचं सौंदर्य कमी करतात. अशात या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बरेच लोक महागडे फेस वॉश किंवा क्रिम वापरतात. पण या गोष्टींमुळे लगेच फरक दिसत नाही, सोबतच पैसेही जास्त खर्च होतात. आपल्याला जर आपली त्वचा ग्लोईंग करायची असेल, तर डॉक्टरांनी सांगितलेल्या किचनमधील दोन गोष्टींचा सहजपणे वापर करू शकता. त्या कोणत्या हे जाणून घेऊया.

डॉ. उपासना यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, आपण फेस वॉशऐवजी दही आणि खोबऱ्याच्या तेलाने सुद्धा त्वचा हेल्दी ठेवू शकता.

फेस वॉशऐवजी दही

डॉ. उपासना सांगतात की, चेहरा धुण्यासाठी फेस वॉशच्या जागी आपण दह्याचा वापर करू शकता. थोडं दही घेऊन चेहरा धुवा. याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्या दूर करण्यास मदत मिळू शकते.

आपल्याला माहीत आहेच की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, टेस्ट आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक पद्धतीने दह्याचा वापर करता येतो. कारण यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करतं. डेड स्किन दूर करतं आणि ओलावा देतं. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते.


रात्री झोपण्याआधी खोबऱ्याच्या तेलाचा वापर

डॉ. उपासना सांगतात की, चेहरा ग्लोईंग आणइ हेल्दी ठेवण्यासाठी आपण रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर खोबऱ्याचं तेल लावा. रोज चेहऱ्यावर रोज खोबऱ्याचं तेल लावून हलक्या हाताने मालिश केल्याने त्वचेला खोलवर ओलावा मिळतो, त्वचेचा रखरखीतपणा दूर होतो, काळे डाग, सुरकुत्या दूर होतात आणि त्वचेची चमक वाढते.

Web Title : महंगे फेस वॉश की जगह, चमकती त्वचा के लिए रसोई की इन चीज़ों का उपयोग करें।

Web Summary : महंगे फेस वॉश को छोड़ें! डॉक्टर ने दही और नारियल तेल इस्तेमाल करने का सुझाव दिया है। दही एक्सफोलिएट करता है, नमी देता है और काले धब्बे कम करता है। नारियल का तेल झुर्रियाँ कम करके त्वचा को चमकदार बनाता है।

Web Title : Use these kitchen items for glowing, youthful skin instead of facewash.

Web Summary : Ditch expensive face wash! A doctor suggests using curd and coconut oil. Curd exfoliates, moisturizes, and reduces dark spots. Coconut oil hydrates deeply, diminishes wrinkles, and boosts radiance for healthy, glowing skin.