Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे चेहरा काळवंडला? १ मिनिटांत चमक आणेल केळीचं साल, जावेद हबीबचा खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 16:04 IST

Face Tanning Solution : हा उपाय केल्यानं तुमच्या चेहऱ्यावर कोणतेही साईड इफेक्टस जाणवणार नाहीत आणि चेहरा टवटवीत एकदम फ्रेश दिसेल.

उन्हाळ्याच्या दिवसांत चेहरा डल पडलाय, चेहरा काळवंडला अशी तक्रार बऱ्याचजणांची असते. अशावेळी पार्लरमधून फेशियल, ब्लीच अशा महागड्या ट्रिटमेंट्स घेतल्या तर तात्पुरता फरक दिसून येतो पण चेहरा परत काळा पडतो. चेहरा टवटवीत,सुंदर दिसण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Jawed Habib ) यांनी काळवंडलेला चेहरा पुन्हा उजळवण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. (Jawed Habib Suggests Use Banana Peel To Get Instant Face Glow)

हा उपाय केल्यानं तुमच्या चेहऱ्यावर कोणतेही साईड इफेक्टस जाणवणार नाहीत आणि चेहरा टवटवीत एकदम फ्रेश दिसेल. केळी बरेचजण आवडीनं खातात आणि केळी खाल्ल्यानंतर सालं फेकून देतात पण तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर केळीचं साल फायदेशीर ठरू शकतं. केळीच्या सालीचे त्वचेसाठी बरेच फायदे आहेत. 

जावेद हबीब यांनी सांगितलेला उपाय कोणता? (How To Use Banana Peel On Face)

केळीचं साल चेहऱ्यावर कसं वापरावं याबाबत आपल्या इंस्टाग्राम पेजवर जावेद हबीब यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जावेद हबीब सांगतात की केळ्याच्या सालीचा पांढरा भाग आपल्या चेहऱ्यावर लावा. 5 मिनिटांनी थंड पाण्यानं चेहरा धुवून घ्या. या सोप्या उपायानं तुम्हाला चेहऱ्यावर तेज आलेलं दिसेल.

केळी त्वचेसाठी फायदेशीर का ठरते?

केळीमध्ये व्हिटामीन बी-6, व्हिटामीन सी यांसारखी पोषक तत्व असतात. याशिवाय यात एंटी ऑक्सिडेंट्सही मोठ्या प्रमाणात असतात  ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक पोत सुधारतो आणि त्वचा चांगली राहते. त्वचेची सूज कमी होण्यास मदत होते. केळीच्या सालीच्या नियमित वापरानं  चेहऱ्यावर ग्लो येते आणि वाढत्या वयाच्या खूणा उशीरानं येतात. चेहऱ्यावरील डागही कमी होतात.

केळ्याचा फेस मास्क कसा तयार करायचा?

1 पिकलेली केळी मॅश करून घ्या.  एक चमचा कच्च मध यासोबत मिसळा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून 20 मिनिटं तसंच ठेवा. नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या. या उपायानं चेहरा हायड्रेट राहतो आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकते आणि मुलायम राहते. हा फेस मास्क त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी उत्तम ठरतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Banana Peel for Instant Glow: Jawed Habib's Quick Remedy

Web Summary : Suffering from dull skin due to the sun? Jawed Habib suggests using banana peel for an instant glow. Apply the white part, leave for five minutes, and wash. Banana peel contains antioxidants and vitamins, improving skin tone and reducing blemishes. A banana and honey mask also hydrates skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी