Lokmat Sakhi >Beauty > तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावण्याचे फायदेच फायदे, स्वस्तात मस्त उपाय,चेहऱ्यावर दिसेल कमाल

तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावण्याचे फायदेच फायदे, स्वस्तात मस्त उपाय,चेहऱ्यावर दिसेल कमाल

Rice Water Benefits : आता तांदळाचा वापर त्वचेसाठी कसा करावा? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हेच आज जाणून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:44 IST2025-04-07T12:39:28+5:302025-04-07T19:44:47+5:30

Rice Water Benefits : आता तांदळाचा वापर त्वचेसाठी कसा करावा? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हेच आज जाणून घेणार आहोत.

Explore the Top Benefits of Rice Water for Skin and Hair | तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावण्याचे फायदेच फायदे, स्वस्तात मस्त उपाय,चेहऱ्यावर दिसेल कमाल

तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावण्याचे फायदेच फायदे, स्वस्तात मस्त उपाय,चेहऱ्यावर दिसेल कमाल

Rice Water Benefits :  त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे घरगुती उपाय करत असतात. कारण केमिकलच्या वापराऐवजी हे उपाय फायदेशीर ठरतात आणि त्यांचे काही साइड इफेक्ट्सही होत नाहीत. पण तरीही अनेकांना हे माहीत नसतं की, तांदळाचा वापर त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासही मदत मिळते. आता तांदळाचा वापर त्वचेसाठी कसा करावा? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हेच आज जाणून घेणार आहोत. ज्याद्वारे तुम्हाला ग्लोईंग, चमकदार आणि मुलायम त्वचा मिळू शकते.

तांदळाच्या पाण्याचे फायदे

1) ग्लोईंग स्कीन

तांदळाच्या पाण्यानं त्वचा चमकदार आणि हेल्दी बनवण्यास मदत मिळते. कारण यात व्हिटॅमिन बी, सी आणि ई असतं.

2) पिंपल्स होतील दूर

तांदळाच्या पाण्यातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण पिंपल्स व त्वचेची जळजळ दूर करण्यास मदत करतात.

3) त्वचा हायड्रेट राहील

तांदळाचं पाणी त्वचेला मॉइश्चराइज करतं, ज्यामुळे त्वचा मुलायम बनते. जर तुम्ही त्वचा नेहमीच ड्राय राहत असेल तर तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता.

4) सुरकुत्या दूर होतील

तांदळाच्या पाण्यात असलेल्या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटने वय वाढण्याचे संकेत जसे की, सुरकुत्या आणि फाइन लाईन्स कमी करण्यास मदत मिळते.

5) सनस्क्रीनसारखा वापर

तांदळाच्या पाण्यात सूर्याच्या नुकसानकारक किरणांपासून त्वचेचा बचाव करणारे तत्व असतात. ज्यामुळे त्वचेचं नुकसान टाळला येतं.

कसा कराल याचा वापर?

तांदळाचं पाणी त्वचेवर लावण्याची आणि ते तयार करण्याची पद्धत आधी जाणून घ्या. तांदळाचं पाणी तयार करण्यासाठी २ कप पाण्यात एक कप तांदूळ भिजवा. अर्ध्या तासांनंतर तुम्हाला तांदूळ खाली बसलेले दिसतील. हे पाणी एका बॉटलमध्ये भरा. चेहऱ्यावर लावण्यासाठी तांदळाचं पाणी तयार आहे. तांदळाचं हे पाणी तुम्ही चेहऱ्यावर थेट लावू शकता. रूईच्या मदतीने तुम्ही हे पाणी चेहऱ्यावर लावावं. त्याशिवाय तांदळाचं पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून चेहऱ्यावर स्प्रे सुद्धा करू शकता.
 

Web Title: Explore the Top Benefits of Rice Water for Skin and Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.