Lokmat Sakhi >Beauty > तुरटी आणि लवंग म्हणजे दातांसाठी वरदान, पिवळे दात होतील शुभ्र चमकदार-पाहा उपाय

तुरटी आणि लवंग म्हणजे दातांसाठी वरदान, पिवळे दात होतील शुभ्र चमकदार-पाहा उपाय

How to Use Clove and Fitkari for Whiten Teeth :आम्ही तुमच्यासाठी दात मोत्यांसारखे चमकदार करण्यासाठी एक नॅचरल उपाय घेऊन आलो आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:31 IST2025-06-25T14:40:40+5:302025-06-25T16:31:47+5:30

How to Use Clove and Fitkari for Whiten Teeth :आम्ही तुमच्यासाठी दात मोत्यांसारखे चमकदार करण्यासाठी एक नॅचरल उपाय घेऊन आलो आहोत.

Expert tells how to use clove and fitkari for whiten teeth | तुरटी आणि लवंग म्हणजे दातांसाठी वरदान, पिवळे दात होतील शुभ्र चमकदार-पाहा उपाय

तुरटी आणि लवंग म्हणजे दातांसाठी वरदान, पिवळे दात होतील शुभ्र चमकदार-पाहा उपाय

How to Use Clove and Fitkari for Whiten Teeth : दात पिवळे झाले की, टूथपेस्ट बदला, यानं घासा, त्यानं घासा असे वेगवेगळे प्रयोग सुरू होतात. इतकंच नाही तर दात घासण्याची वेळही काही लोक वाढवतात. कारण पिवळे दात एकतर चांगले दिसत नाही आणि चारचौघात मोकळेपणाने हसताही येत नाही. पण अनेक उपाय करूनही दात काही केल्या आधीसारखे चमकदार होत नाही. तुम्ही सुद्धा अनेक प्रयत्न करू थकले असाल तर चिंता सोडा. कारण आम्ही तुमच्यासाठी दात मोत्यांसारखे चमकदार करण्यासाठी एक नॅचरल उपाय घेऊन आलो आहोत.

महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नाही. 
दात चमकदार करण्यासाठीचा हा उपाय म्हणजे तुरटी आणि लवंग. तुरटी आणि लवंगचा हा उपाय करून केवळ दात चमकदार होतात असं नाही तर तोंडाची दुर्गंधी आणि दातांची कीडही दूर होते. आयुर्वेद डॉक्टर उपेंद्र बहादुर यांनी Onlymyheath ला हा उपाय कसा करावा याबाबत माहिती दिली आहे.

कसा कराल उपाय?

डॉक्टर सांगतात की, दातांसाठी तुरटी आणि लवंग दातांसाठी फार आधीपासून वापरली जाते. तुरटीनं दातांवरील पिवळेपणा दूर होतो, हिरड्यांचं दुखणं कमी होतं आणि दातांची कीडही दूर होते. तर लवंग तोंडाची दुर्गंधी दूर करते. दातांसाठी तुरटी आणि लवंगचा वापर करणं फारच सोपं आहे.

यासाठी अर्धा लीटर पाण्यात ७ ते ८ लवंग टाकून ठेवा. नंतर या पाण्यात तुरटीचा एक तुकडा टाकून ५ मिनिटांसाठी तसाच राहू द्या. हे तुरटी आणि लवंगाच्या पाण्याचं मिश्रण झाकून ३ दिवसांसाठी तसंच ठेवा. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठीचं पाणी तयार आहे. रोज सकाळी ब्रश केल्यानंतर ५ ते ७ मिनिटं या पाण्यानं गुरळा करा.

Web Title: Expert tells how to use clove and fitkari for whiten teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.