Anti Aging Foods: ३० वयानंतर व्यक्तीचं खरं जीवन सुरू होतं. कारण या वयानंतर शिक्षण पूर्ण होऊन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या अंगावर येतात. लग्न, नोकरी आणि मुलं हे सगळं या टप्प्यातच सुरू होतं. अशात या वयात हेल्दी आणि तरूण राहण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. वय वाढणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे, ज्याचा प्रभाव शरीरावर त्या त्या टप्प्यात दिसू लागतो. या वयानंतर वजन वाढणं, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, थकवा, कमजोरी, सुरकुत्या येणं यांसारख्या समस्या होऊ लागतात. जबाबदाऱ्यांच्या टेंशनमुळे कमी वयातच व्यक्ती म्हातारी दिसू लागते. जर ही समस्या दूर करायची असेल तर डाएटमध्ये फायबर, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, कॅल्शिअम, प्रोटीन आणि प्लांट बेस्ड डाएट फूड्सचा समावेश करावा लागेल.
अक्रोड
अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन ई असतं. जे त्वचेला निरोगी आणि तरूण ठेवण्यास मदत करतं. हे तुमच्या हार्ट हेल्थसाठीही फायदेशीर असतं आणि वाढत्या वयाचा प्रभावही स्लो करतं.
हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी, चवळी अशा हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न, फोलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन के भरपूर असतं. यानं तुमची हाडं आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते आणि शरीरात होणारी सूजही कमी होते.
बेरीज
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी सारख्या बेरीजमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात, जे तुमच्या त्वचेचा सूर्याच्या घातक किरणांपासून बचाव करतात. हे तत्व फ्री रॅडिकल्ससोबत लढून शरीर तरूण ठेवण्यास मदत करतात, तसेच सेल्स डॅमेजही रोखतात.
ग्रीक योगर्ट
ग्रीक योगर्टमध्ये प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स भरपूर असतात, जे पचन तंत्र मजबूत ठेवण्यास मदत करतात. यानं तुमच्या त्वचेवर ग्लो येण्यासोबतच हाडं आणि मांसपेशी मजबूत होतात. हे रोज खाल्ल्यास वाढत्या वयाचा प्रभाव त्वचेवर कमी दिसतो.
संत्री आणि इतर आंबट फळं
संत्री, लिंबू, आवळा यांसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जे कोलेजन प्रोडक्शनमध्ये मदत करतं. कोलेजन त्वचा तरूण दिसण्यात महत्वाची भूमिका निभावतं. तसेच यामुळे त्वचा लवचिकही राहते.
वरील पाच गोष्टींचा आहारात समावेश कराल तर वाढत्या वयाची लक्षणं शरीरावर कमी प्रमाणात दिसतील. त्वचा तरूण दिसेल, हृदय निरोगी राहील आणि पचन तंत्रही मजबूत राहणार.