Lip Care Tips in Winter : थंडीमुळे जास्तीत जास्त लोकांना ओठ फाटण्याची किंवा कोरडे होण्याची समस्या होणं कॉमन आहे. या दिवसात ओठांवर भेगा पडतात आणि मासही निघतं. यासाठी हिवाळ्यात कमी पाणी पिणे, हेल्दी पदार्थ न खाणे आणि जुने प्रॉडक्ट वापरणे ही कारणे सांगता येतील. अशात या दिवसात ओठांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
कशी घ्याल ओठांची काळजी?
- महिला ओठांवर नेहमीच लिपस्टिक लावतात. हे लिपस्टिक जोर लावून किंवा घासून काढण्याचा प्रयत्न करू नका. याने ओठांची त्वचा घासली जाते. तसेच नेहमी असं केल्याने ओठांचा आकारही बिघडू शकतो.
- जेव्हा तुम्ही चहा पिता किंवा कोणतंही गरम द्रव्य पिता तेव्हा काळजी घ्या की, फार गरम काही सेवन करू नये. कारण ओठ जेव्हा गरम ग्लास किंवा कपाच्या संपर्कात येतात, त्याने ओठाची त्वचा काळवंडते. याने नंतर ओठांचा मुलायमपणाही कमी होतो.
- हिवाळ्यात हलके पदार्थ भरपूर खावेत आणि पाणीही भरपूर प्यावे. याने ओठांचा मुलायमपणा टिकून राहतो आणि ओठांची काळजीही योग्य पद्धतीने घेतली जाते. ओठांची त्वचा ड्राय होणार नाही.
- रात्री झोपताना ओठांवर खोबऱ्याचं तेल लावावं. जर खोबऱ्याचं तेल लावायचं नसेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं पेट्रोलियम जेली सुद्धा वापरू शकता. जेली लावल्यावर हळुवारपणे तुम्ही ओठांची मसाजही करू शकता.
- जर ओठ फाटत असतील तर मुलायम करण्यासाठी रात्री झोपण्याआधी ओठांवर मध लावावे. सकाळी थंड पाण्याने ओठ धुवावे. ओठ मुलायम होतील.
- हेल्दी पदार्थांचं सेवनही यासाठी महत्वाचं ठरतं. हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं मिळतात. अनेकदा शरीरात आयर्नची कमतरता असेल तर ओठ काळे पडतात. त्यामुळे हेल्दी पदार्थांचं सेवन करणं महत्वाचं ठरतं.
- ओठ तेव्हाच चांगले राहतील जेव्हा ओठांमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगलं होईल. यासाठी नियमितपणे ओठांची हलक्या हाताने मसाज करावी.
- ओठांवरील लिपस्टिक क्लीजिंग मिल्कने काढा. कॉटनवर क्लीजिंग मिल्क लावून ओठ साफ करा. तसेच मलाईमध्ये लिंबू मिक्स करूनही तुम्ही ओठांची मालिश करू शकता.
Web Summary : Winter dryness causes cracked lips. Avoid hot drinks, use lip balm (coconut oil/petroleum jelly), gently massage, and exfoliate with honey. Hydrate well, eat healthy, and remove lipstick gently for healthy, soft lips.
Web Summary : सर्दियों में होंठ फटना आम है। गर्म पेय से बचें, नारियल तेल/पेट्रोलियम जेली लगाएं, मालिश करें, शहद से एक्सफोलिएट करें। हाइड्रेटेड रहें, स्वस्थ खाएं और धीरे से लिपस्टिक हटाएं, होंठ मुलायम रहेंगे।