Open Pores Home Remedies : काही लोकांच्या त्वचेचे टिश्यूज डॅमेज झाल्याने चेहऱ्यावर खड्डे दिसू लागतात. अनेक लोकांच्या चेहऱ्यावर मुरुमांमुळेही असे गड्ढे पडतात. मात्र, पोअर्स म्हणजेच रोमछिद्रे हे आपल्या त्वचेचा नैसर्गिक भाग आहेत आणि ते पूर्णपणे नाहीसे करणे शक्य नाही. तरीही काही सोप्या उपायांनी ते नक्कीच कमी करता येतात. तुम्हालाही चेहऱ्यावर खड्ढे किंवा मोठी रोमछिद्रे दिसत असतील आणि ती कमी करायची असतील, तर खालील सोपे उपाय उपयोगी ठरू शकतात.
जेंटल क्लिन्झिंग
दिवसातून दोन वेळा हलक्या, नॉन-कॉमेडोजेनिक क्लिन्झरचा वापर करणे पुरेसं असतं. कोमट पाण्याचा वापर करा आणि त्वचा जोर लावून घासणं टाळा. खूप जास्त क्लिन्झिंग केल्याने त्वचा कोरडी होते, त्यामुळे अधिक तेल तयार होते आणि रोमछिद्रे अधिक मोठी दिसू लागतात.
क्ले मास्क
आठवड्यातून एक ते दोन वेळा क्ले मास्क लावा. क्ले मास्क अतिरिक्त तेल शोषूण घेण्यास आणि रोमछिद्रे मोठी दिसण्यास कारणीभूत ठरणारी धूळ-माती व घाण साफ करण्यास मदत करतो. मात्र, रोज वापर केल्यास त्वचा कोरडी होऊ शकते आणि त्याचा फायदा कमी होतो.
मॉइश्चरायझिंग
कोरडी त्वचा अनेकदा त्याची भरपाई करण्यासाठी जास्त तेल तयार करते. अशा वेळी मॉइश्चरायझर त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे काही काळाने रोमछिद्रे कमी दिसू लागतात. हलका, नॉन-ग्रीसी मॉइश्चरायझर वापरा, जो त्वचेला हायड्रेटेड ठेवतो आणि पोअर्स कमी करायला मदत करतो.
सनस्क्रीन
दररोज SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावल्यास दीर्घकाळ संरक्षण मिळतं, खासकरून आपण उन्हात जास्त वेळ घालवत असाल तर. अल्ट्राव्हायोलेट किरणं कोलेजन नष्ट करतात, त्यामुळे कालांतराने रोमछिद्रे अधिक ठळक दिसू लागतात. हा असा उपाय आहे, जो हळूहळू पण नक्की फायदा देतो.
छोट्या सवयी
पुरेशी झोप घेणे, व्यायामानंतर चेहरा स्वच्छ धुणे आणि हात वारंवार चेहऱ्यावर नेण्यापासून टाळणे अशा छोट्या सवयी अंगीकारा. या सोप्या उपायांचे पालन केल्यास त्वचा निरोगी राहते आणि रोमछिद्रांचा दिसणारा प्रभाव कमी होतो.
