Join us

'या' थंडीत टाचांवरील भेगा देणार नाही त्रास, फक्त रोज करावे लागतील 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 15:03 IST

Cracked Heels Care Tips in Winter : या हिवाळ्यात आपल्या टाचांना भेगा पडू नये आणि पाय सुंदर दिसावेत असं वाटत असेल तर काही सोप्या, घरगुती टिप्स फॉलो करू शकता.

Cracked Heels Care Tips in Winter : थंडीला हलकी जरी सुरूवात झाली की, त्वचेच्या आणि केसांच्या वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. स्किन ड्राय होते, फाटते आणि केसांमध्ये कोंडा होतो. ते रखरखीत होतात. यासोबतच एक सगळ्यात जास्त होणारा त्रास म्हणजे. टाचांना भेगा. खासकरून महिलांना हा त्रास अधिक होतो. जर वेळीच यावर उपाय केले नाही किंवा योग्य ती काळजी घेतली नाही तर दुखणं चांगलंच वाढतं. सोबतच त्या दिसतही चांगल्या नाही. अशात या हिवाळ्यात आपल्या टाचांना भेगा पडू नये आणि पाय सुंदर दिसावेत असं वाटत असेल तर काही सोप्या, घरगुती टिप्स फॉलो करू शकता.

काही खास तेल

खोबऱ्याच्या तेलाने केवळ केस आणि चेहऱ्याचीच त्वचा चांगली राहते असे नाही तर टाचांना पडलेल्या भेगाही दूर होतात. रात्री झोपताना पायांना तेल लावून झोपावे. याने पायांची त्वचा मुलायम होईल. तसेच तुम्ही ऑलिव्ह ऑइलचाही वापर करू शकता. ओटमील पावडरमध्ये जोजोबा ऑइल मिश्रित करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाचांना लावा. काही वेळाने पाय कोमट पाण्याने धुवावे.

कॉफीच्या बिया

कॉफी ग्राउंड्स टाचांची सूज दूर करते. तसेच वेदनाही कमी होतात. कॉफी ग्राउंड्समध्ये अ‍ॅंटी-इफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. ज्याने टाचांना भेगा पडण्याची समस्या दूर होते. याने तळपायांना स्क्रब केल्याने त्वचेच्या टेक्सचरमध्येही सुधारणा होते.

मधाचा वापर

मध त्वचेला मॉइश्चराइज करतं. पाय स्वच्छ करून रात्री झोपण्याआधी मध लावा, थोडावेळ तसंच ठेवा आणि नंतर पाय पाण्याने धुवावे. याने टाचेची त्वचा हायड्रेट राहते. तसेच बकेटीत थोडं पाणी घेऊन त्यात मध टाका. त्यात पाय ठेवा, काही वेळाने पाय टॉवेलने पुसून घ्या. असं नियमित करा.

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याने पायांना स्क्रब करा. याने टाचांना पडलेल्या भेगांनी होणाऱ्या वेदना आणि सूज दूर होईल. पायांच्या बोटांमध्ये फंगसही होणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Winter Cracked Heel Relief: Simple Daily Home Remedies to Heal.

Web Summary : Winter brings cracked heels, especially for women. Home remedies like coconut/olive oil, coffee scrubs, honey, and baking soda soaks can moisturize, reduce inflammation, and exfoliate, leading to smoother, pain-free heels.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स