Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेकअप न करता सुंदर दिसेल चेहरा! ४० दिवस 'हा' घरगुती चहा प्या; चेहऱ्यावर येईल तेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 17:58 IST

Summer Glow Tea Recipe : सकाळी चहा, कॉफीऐवजी हे ड्रिंक घेतल्यास  ४० दिवसांत तुम्हाला फरक दिसून येईल.

आपला चेहरा नैसर्गिकरित्या सुंदर दिसावा, मेकअप न करता चेहऱ्यावर ग्लो असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मेकअप न  करता त्वचा ग्लोईंग आणि रेडीएंट दिसायला हवी असेल तर तुम्हाला काही महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्सची मदत घ्यावी लागेल. एक्सपर्ट्स सांगतात की ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट तुमच्या आहारात लपलेलं आहे. आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही त्वचेवर नैसर्गिकरित्या ग्लो आणू शकता. सकाळी चहा, कॉफीऐवजी हे ड्रिंक घेतल्यास ४० दिवसांत तुम्हाला फरक दिसून येईल. (Drink This Summer Glow Tea For 40 Days To Get Naturally radiant Skin)

४० दिवसांत दिसेल ग्लोईंग स्किन (Summer Glow Tea Recipe)

त्वचेवर काहीही लावले तरी आतून ग्लो दिसत नसेल तर तुम्ही समर ग्लो टी घेऊ शकता.  हा चहा इतका इफेक्टिव्ह असतो की  ४० दिवसांत तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. ताजी पुदीन्यााची पानं, आल्याचा तुकडा, दालचिनीचा तुकडा, लिंबू आणि थोडं मध हे साहित्य तुम्हाला लागेल. हे साहित्य वापरून तुम्ही रिफ्रेशिंग चवदार चहा बनवू शकता. हा चहा करणायाची योग्य रेसिपी पाहूया.

एका मोठ्या भांड्यात १ ग्लास पाणी गरम करायला ठेवा.  त्यात ५ ते ६ ताजी पुदिन्याची पानं आणि आल्याचा छोटा तुकडा आणि दालचिनी घालून शिजवायला ठेवा. तुम्ही दालचिनी पावडरचाही वापर करू शकता.  ५ ते ७ मिनिटांसाठी असंच शिजू द्या. थंड  झाल्यानंतर हे पाणी  ग्लासमध्ये भरा. त्यात एक लिंबू पिळा आणि १ चमचा मध घाला. जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर मध घालू नका.


हा चहा कसा फायदेशीर ठरतो?

एक्सपर्ट्स सांगतात की जेव्हा चेहरा आतून हायड्रेट आणि हेल्दी होतो तेव्हा चेहऱ्यावर ग्लो दिसून येतो. लिंबात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. याव्यतिरिक्त यात पुदिना, आलं आणि दालचिनी असते जी शरीराला  नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यास मदत करते. आणि मध त्वचा हेल्दी आणि  ग्लोईंग ठेवण्यास मदत करते. 

या गोष्टींची काळजी घ्या

फक्त हेल्दी आणि ग्लोईंग स्किनसाठी हा चहा पिणं पुरेसं नाही तर चांगला आहारसु्द्धा घ्यायला हवा आणि चांगली लाईफस्टाईलही ठेवा.  याव्यतिरिक्त बेसिक स्किन केअर रुटीन फॉलो करा. ज्यात क्लिनिंग, मॉईश्चराजिंग आणि सनस्क्रीन लावा.  डॉक्टरांच्या सल्ल्यानं आहारात या पदार्थांचा समावेश करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Drink this tea for 40 days for naturally glowing, beautiful skin.

Web Summary : Desire radiant skin? This homemade tea, with mint, ginger, and lemon, promises a natural glow in 40 days. Experts say the recipe, combined with a healthy lifestyle and skincare, will hydrate and detoxify the skin from within.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी