जर तुम्हालाही वाटतं की आपली त्वचा सकाळी फ्रेश आणि चमकदार दिसावी तर यासाठी महागडी उत्पादनं वापरण्याची काहीच गरज नाही (Skin Care Tips). आयुर्वेदानुसार काही घरगुती उपाय करून तुम्ही कोमल, चमकदार, स्वच्छ त्वचा मिळवू शकता. रात्री झोपताना काही पदार्थ पाण्यासोबत घेतले तर शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि त्वचेवरही चांगला परिणाम दिसून येतो. कोणते पदार्थ त्वचेवर लावल्यानं चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो ते समजून घेऊ. (Drink Ghee Lemon With Lukewarm Water)
कोमट पाण्यात एक चमचा तूप, लिंबचा रस, किंवा मध मिसळून पिऊ शकता. हे तिन्ही पदार्थ त्वचेसाठी बरेच फायदेशीर ठरतात. तुपामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं आणि सुरकुत्या कमी होतात. लिंबू व्हिटामीन सी ने परिपूर्ण आहे ज्यामुळे त्वचा ब्राईट बनते. यातील एंटी ऑक्सिडेंट्स त्वचेला ब्राईट बनवतात. त्वचेत रक्तप्रवाह चांगला होतो. कोमट पाण्यानं त्वचेत रक्तप्रवाह चांगला होतो (Ref). ज्यामुळे ऑक्सिजन आणि न्युट्रिएंट्स त्वचेत सहज पोहोचतात. शरीर डिटॉक्स होते ज्यामुळे त्वचा साफ होते आणि चमकदार दिसते. जेव्हा पोट साफ नसतं तेव्हा त्वचेवर त्याचा परिणाम दिसायला सुरूवात होते.
केसाची शेपटी झाली-खूपच गळतात? ५ रूपयांचा कढीपत्ता 'या' पद्धतीनं लावा, केसांत येईल जान
पिंपल्स आणि डलनेसमुळे चेहरा खराब वाटतो अशावेळी चांगल्या झोपेनं स्किन रिपेअर होते आणि चेहरा फ्रेश दिसतो. रात्री झोपण्याच्या ३० मिनिटं आधी १ ग्लास कोमट पाणी प्या, त्यात तुम्ही आपले आवडते पदार्थ तूप, लिंबू किंवा मध घालू शकता. हळूहळू चहाप्रमाणे याचे सेवन करा. यानंतर कोणतेही जड पदार्थ खाऊ नका. ग्लोईंग स्किनसाठी महागड्या उत्पादनांची आवश्यकता नाही. फक्त १ ग्लास कोमट पाणी वापरल्यास त्वचा आतून चमकदार दिसेल. ही सोपी, सुरक्षित पद्धत आहे.
त्वचा तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी शरीरात पाणी असणं फार महत्वाचे आहे. त्यामुळे त्वचा मऊ, मुलायम राहते. शरीर डिटॉक्स होते. त्वचेला घाम आल्यानं त्वचा डिटॉक्स होण्यासही मदत होते. पचनक्रियासुद्धा चांगली राहते. कोमट पाण्यानं त्वचा हायड्रेट राहते. त्वचेचा लवचीकपणा आणि सॉफ्टनेस टिकून राहतो.