चेहर्याची त्वचा मऊ, स्वच्छ आणि टवटवीत दिसण्यासाठी नियमित एक्सफोलिएशन म्हणजेच मृत त्वचापेशी काढणे गरजेचे असते. यासाठी घरच्या घरी करता येणारा साखरेचा स्क्रब हा सोपा आणि प्रभावी उपाय आहे. साखरेचे बारीक दाणे त्वचेवरील मृत पेशी अलगद काढून टाकतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात. (Don't eat sugar but definitely use its scrub - A great solution to cleanse the skin, pores will be clean)मात्र तो योग्य पद्धतीने वापरणे आणि आपल्या त्वचेप्रमाणे घटक मिसळणे महत्त्वाचे आहे.
साखरेचा स्क्रब तयार करताना पांढरी किंवा ब्राऊन साखर वापरू शकता. साखरेत नैसर्गिक ग्लायकोलिक अॅसिडचे अंश असतात, जे त्वचा मऊ करण्यास मदत करतात. दोन चमचे साखरेत एक चमचा नैसर्गिक तेल मिसळले की साधा स्क्रब तयार होतो. हे तेल खोबरेल, बदाम किंवा ऑलिव्ह ऑईल असू शकते. या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने गोलाकार हालचालीत दोन ते तीन मिनिटे मसाज करावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाकावे.
कोरड्या त्वचेसाठी साखर आणि मध हे उत्तम मिश्रण आहे. मध त्वचेला ओलावा देतो आणि सौम्य जंतुनाशक गुणधर्मही असतात. साखर आणि मध एकत्र करून तयार केलेला स्क्रब त्वचेला पोषण देतो आणि कोरडेपणा कमी करतो.
तेलकट त्वचेसाठी साखर आणि लिंबूरस उपयोगी ठरतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते. मात्र लिंबूरस फार जास्त प्रमाणात वापरू नये आणि स्क्रब केल्यानंतर लगेच उन्हात जाऊ नये, कारण त्वचा संवेदनशील होऊ शकते. तसेच लिंबू सगळ्यांनाच सुट होतो असे नाही.
सगळ्यात मस्त असे मिश्रण म्हणजे साखर आणि कॉफी पावडर. हे मिश्रण त्वचा स्वच्छ तर करतेच शिवाय पोषण आणि मऊ त्वचाही देते. करायला सोपा आहे आणि दोन्ही पदार्थ घरात असतात. फक्त कोणतीही फ्लेवरवाली कॉफी न ेता साधी प्लेनच वापरा. तरच फायदा होतो.
स्क्रब करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. खूप जोरात चोळू नये, कारण त्यामुळे त्वचेवर सूक्ष्म जखमा होऊ शकतात. आठवड्यातून एक ते दोन वेळाच स्क्रब करावा. पिंपल्स किंवा जास्त संवेदनशील त्वचा असल्यास आधी छोट्या भागावर टेस्ट करुन पाहावे.
थोडक्यात, साखरेचा स्क्रब हा घरच्या घरी करता येणारा किफायतशीर आणि नैसर्गिक उपाय आहे. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य घटक मिसळून वापरल्यास चेहरा अधिक स्वच्छ, मऊ आणि उजळ दिसू शकतो. नियमित पण मर्यादित वापर हीच सुंदर त्वचेची गुरुकिल्ली आहे.
Web Summary : Sugar scrub gently exfoliates, revealing radiant skin. Mix sugar with oil for normal skin, honey for dry, or lemon for oily. Coffee powder mix gives soft skin. Use gently, once or twice weekly.
Web Summary : चीनी का स्क्रब धीरे से एक्सफोलिएट करता है, जिससे त्वचा निखरती है। सामान्य त्वचा के लिए चीनी को तेल के साथ, रूखी त्वचा के लिए शहद के साथ या तैलीय त्वचा के लिए नींबू के साथ मिलाएं। कॉफी पाउडर मिश्रण त्वचा को मुलायम बनाता है। धीरे से, सप्ताह में एक या दो बार प्रयोग करें।