तुमची ही त्वचा सारखी कोरडी पडते का? त्वचेचा मुळात पोतच तसा आहे असे समजून आपण त्यासाठी उपाय करत नाही. मात्र प्रत्येक वेळी त्वचेचा पोतच कारण असेल असे नाही. (Does your skin become dry? Avoid these 7 mistakes, your skin will remain flowless )काही आपल्या चुकांमुळेही त्वचा कोरडी पडते. त्यामुळे जर तुम्हीही या चुका करत असाल तर त्या टाळा त्वचा नक्कीच छान मऊ होईल.
घामाचा वास येऊ नये आणि छान सुगंध यावा यासाठी स्प्रे, डिओ, परफ्युमचा वापर केला जातो. मात्र त्यामुळे त्वचा कोरडी पडू शकते. सगळ्यांच्याच त्वचेला ते सुट होत नाही. त्यामुळे असे प्रॉडक्ट्स जरा जपूनच वापरा.
गरम पाण्याने अंघोळ करणे म्हणजे सुख. थंडीत तर एकदम कढत पाणी आपण घेतो. मात्र गरम पाणी त्वचेचा ओलावा कमी करते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा. जमत असेल तर गार पाणी जास्त घ्या. साबण कोणता वापरता ? साबणाचा PH तपासून पाहा मगच साबण घ्या. साबणाचा पीएच फारच जास्त असेल तर तो त्वचेवरील तेल ओढून घेतो. त्यामुळे त्वचा कोरडी होते.
दिवसातून अनेक वेळा हात धुणे चांगले असते. स्वच्छता राखणे गरजेचे आहे. मात्र सतत चेहरा आणि हात धुतल्याने त्वचा कोरडी पडते. त्यामुळे रुमालाने चेहरा-हात पुसा. सारखे पाणी लाऊ नका. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. त्वचा कोरडी पडते कारण शरीराला आतून पाणी पुरवठा कमी पडतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या. त्यामुळे त्वचा कोरडी होण्याचे प्रमाण तर कमी होईलच शिवाय त्वचा सुंदर आणि मुलायमही होईल.
हार्मोनल बदलांमुळे त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण वाढते. महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो कारण सततच्या हार्मोनल बदलांमुळे तसेच पाळीच्या दिवसातही त्वचा कोरडी पडते. सतत औषध घेण्याची सवयही त्वचेवर परिणाम करते. पेनकिलर तसेच लहानसहान दुखण्यातही गोळी घेण्याची सवय टाळा. नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय करा.