Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि पांढरी फटफटीत होते ? फक्त ५ उपाय, त्वचा होईल मऊ मुलायम कापसासारखी

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि पांढरी फटफटीत होते ? फक्त ५ उपाय, त्वचा होईल मऊ मुलायम कापसासारखी

Does your skin become dry and flaky in winter? Just 5 remedies, your skin will become soft and smooth like cotton : थंडी म्हणजे कोरडी त्वचा. त्वचेची काळजी घ्या. करा हे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2025 16:10 IST2025-11-13T16:08:24+5:302025-11-13T16:10:03+5:30

Does your skin become dry and flaky in winter? Just 5 remedies, your skin will become soft and smooth like cotton : थंडी म्हणजे कोरडी त्वचा. त्वचेची काळजी घ्या. करा हे उपाय.

Does your skin become dry and flaky in winter? Just 5 remedies, your skin will become soft and smooth like cotton. | हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि पांढरी फटफटीत होते ? फक्त ५ उपाय, त्वचा होईल मऊ मुलायम कापसासारखी

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि पांढरी फटफटीत होते ? फक्त ५ उपाय, त्वचा होईल मऊ मुलायम कापसासारखी

हिवाळा आला की त्वचेतील ओलावा कमी होतो. गार वातावरण असल्यामुळे सगळे गरम पाण्यानेच अंघोळ करतात. गरम पाणी जरी अंघोळ करताना छान वाटले तरी त्यामुळे त्वचा कोरडी होते. तसेच थंडीत तहान कमी लागते. (Does your skin become dry and flaky in winter? Just 5 remedies, your skin will become soft and smooth like cotton.)त्यामुळे पाणी प्यायचे प्रमाण कमी होते. शरीराला पाणी पुरवठा कमी झाला की त्याचा परिणाम लगेच दिसतो. थंड वारे, कोरडी हवा आणि गरम पाण्याने अंघोळ या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्वचा राठ, कोरडी आणि निस्तेज होते. हातपायांवर नख फिरवलं की लगेच पांढरे ओरखडे दिसतात. काहीजणांना खाज, कातडी सोलणे असा त्रास होतो. हे दिसायला किरकोळ वाटलं तरी त्वचेत ओलावा व पोषण कमी झाल्याचं हे लक्षण आहे. म्हणूनच हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

हिवाळ्यात त्वचा सांभाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत ते नक्की करुन पाहा. अगदी साधे असतात तसेच प्रभावी असतात. 

१. दररोज झोपण्यापूर्वी खोबरेल तेलात थोडं तूप आणि दोन थेंब गुलाबपाणी मिसळा आणि हात-पायांवर हलक्या हाताने मसाज करा. हा नैसर्गिक मॉइश्चरायझर त्वचेला खोलवर पोषण देतो, ओलावा टिकवतो आणि कोरडेपणा लगेच कमी करतो.

२. कोरफडीच्या जेलमध्ये बदाम तेलाचे काही थेंब घालून लावल्यास त्याचा फायदा होतो. त्वचा अगदी मऊ आणि तजेलदार दिसते. हे मिश्रण थंडीतले एक प्रभावी नैसर्गिक क्रीम ठरते. घरी करणेही सोपे आहे. आठवड्यातून एकदा नक्की लावा. 

३. आठवड्यातून दोनदा मध आणि दही एकत्र करुन लेप लावा. मध त्वचेला ओलावा देते, तर दह्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेतील मृत पेशी दूर करुन चमक वाढवते. त्यामुळे त्वचेसाठी मध दही पोषक ठरते. 

४. अंघोळीच्या पाण्याचे तापमान जरा कोमट ठेवा. कढत पाण्याने अंघोळ करताना जरी बरे वाटले तरी त्वचेवर त्याचा वाईट परिणाम होतो. हा एक छोटासा पण परिणामकारक उपाय आहे.

५. आहारातही बदल आवश्यक आहे. दररोज पुरेसं पाणी प्या, आणि तीळ, अळशी, सुकामेवा, अवोकॅडो आणि नारळ यांचा समावेश करा. हे पदार्थ त्वचेला आतून ओलावा आणि जीवनसत्वे देतात. हिवाळ्यात त्वचेची काळजी म्हणजे फक्त लोशन लावणं नव्हे, तर शरीराला आतून निरोगी ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या घरगुती आणि सोप्या उपायांनी कोरडी त्वचा, पांढरे ओरखडे आणि खरखरीपणा दूर होईल, आणि तुमची त्वचा राहील मऊ, तजेलदार आणि नैसर्गिकरित्या सुंदर!

Web Title : सर्दियों में रूखी त्वचा? मुलायम त्वचा के लिए 5 उपाय।

Web Summary : सर्दियों में रूखी त्वचा से निपटने के लिए आसान घरेलू उपाय। नारियल तेल मालिश, एलोवेरा और बादाम तेल, शहद-दही मास्क, गुनगुने पानी से स्नान, और नट्स और सीड्स का हाइड्रेटिंग आहार नमी बहाल कर त्वचा को मुलायम और स्वस्थ रख सकते हैं।

Web Title : Dry skin in winter? 5 remedies for soft, cotton-like skin.

Web Summary : Combat winter's dry skin with simple home remedies. Coconut oil massage, aloe vera with almond oil, honey-yogurt masks, lukewarm baths, and a hydrating diet of nuts and seeds can restore moisture and keep skin soft and healthy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.