Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > ना धड विंचरता-ना धड बांधता म्हणून तुमचे केस तुटतात? पाहा केस गळण्याचे महत्वाचे कारण

ना धड विंचरता-ना धड बांधता म्हणून तुमचे केस तुटतात? पाहा केस गळण्याचे महत्वाचे कारण

Does your hair break because you don't comb it or tie it? See the important reasons for hair loss : केस गळण्याचे महत्वाचे कारण जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2026 19:00 IST2026-02-17T18:59:01+5:302026-02-17T19:00:41+5:30

Does your hair break because you don't comb it or tie it? See the important reasons for hair loss : केस गळण्याचे महत्वाचे कारण जाणून घ्या.

Does your hair break because you don't comb it or tie it? See the important reasons for hair loss | ना धड विंचरता-ना धड बांधता म्हणून तुमचे केस तुटतात? पाहा केस गळण्याचे महत्वाचे कारण

ना धड विंचरता-ना धड बांधता म्हणून तुमचे केस तुटतात? पाहा केस गळण्याचे महत्वाचे कारण

केस बांधणे ही रोजची साधी सवय. पण चुकीच्या पद्धतीने केस बांधल्यामुळे केस तुटणे, गळणे आणि मुळांवर ताण येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः लांब केस असणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. त्यामुळे केस बांधताना काही गोष्टींची काळजी घेतली तर केसांचे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते. सर्वात आधी केस पूर्णपणे कोरडे असताना बांधणे महत्त्वाचे आहे. ओले केस मुळांपासून कमकुवत असतात. अशा वेळी घट्ट पोनीटेल किंवा वेणी घातल्यास केस जास्त तुटतात. अंघोळीनंतर केस अर्धवट सुकलेले असताना बांधणे टाळावे.

केस खूप घट्ट बांधू नयेत. सतत घट्ट पोनीटेल, बन किंवा वेणी घातल्याने मुळांवर ताण येतो. यामुळे ट्रॅक्शन हेअर लॉस म्हणजेच ओढल्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. कपाळाजवळचे केस पातळ होणे ही याची सुरुवात असू शकते. म्हणून केस सैलसर बांधण्याची सवय लावावी. योग्य हेअरबँड निवडणेही महत्त्वाचे आहे. खूप घट्ट रबरबँड किंवा मेटल असलेले बँड केस तोडण्याचे काम करतात आणि त्यामुळे केस तुटायला लागतात. सॉफ्ट, कापडी किंवा स्क्रंची प्रकारचे हेअरबँड वापरणे अधिक सुरक्षित ठरते. तसेच रोज एकाच जागी पोनीटेल न बांधता थोडी जागा बदलल्यास मुळांवर समान ताण पडतो.

केस बांधण्यापूर्वी हलक्या हाताने विंचरावेत. गुंता सोडवताना केस ओढू नयेत. रुंद दातांचा कंगवा वापरल्यास केस कमी तुटतात. जर केस खूप कोरडे असतील तर थोडेसे सिरम किंवा हलके तेल लावून मग बांधल्यास घर्षण कमी होते. रात्री झोपताना केस घट्ट बांधणे टाळावे. खूप घट्ट वेणी किंवा बन बांधून झोपल्यास केसांवर सतत ताण पडतो. सैल वेणी किंवा मोकळे केस ठेवणे अधिक योग्य आहे. साटन किंवा सिल्कच्या उशीच्या अभ्रेवर झोपल्यास केसांचे घर्षण कमी होते आणि तुटणेही कमी होते. वारंवार हेअरस्टाईल बदलताना केमिकल स्प्रे किंवा जेलचा अति वापर करू नये. हे पदार्थ केस कडक करतात आणि बांधताना केस अधिक तुटतात.

केस सुंदर आणि मजबूत राहावेत यासाठी फक्त बाहेरुन काळजी पुरेशी नसते. योग्य आहार, पुरेसे पाणी आणि नियमित तेल मालीश यामुळेही केसांची ताकद वाढते. थोडक्यात, केस बांधणे ही साधी गोष्ट असली तरी योग्य पद्धतीने केली तर केसांचे तुटणे आणि गळणे मोठ्या प्रमाणात कमी करता येते. सैल बांधा, योग्य साधने वापरा आणि केसांना वेळोवेळी विश्रांती द्या. यामुळे केस निरोगी, दाट आणि मजबूत राहतील.

Web Title : बाल टूटने का कारण? बालों को बांधने का सही तरीका जानिए।

Web Summary : गलत तरीके से बाल बांधने से वे टूटते हैं। बालों को सूखा, ढीला बांधें, मुलायम बैंड का प्रयोग करें। टाइट हेयरस्टाइल, केमिकल्स से बचें और सोते समय बालों को खुला रखें या ढीली चोटी बनाएं। आहार और तेल मालिश भी सहायक हैं।

Web Title : Hair breakage? Learn key reasons and proper hair-tying techniques now.

Web Summary : Tying hair improperly causes breakage. Tie dry, loosely, using soft bands. Avoid tight styles, chemicals, and sleep with hair loose or in a braid. Diet and oil massages also help.