Join us

चेहरा सुजलेला दिसतो ? गाल मोठे आणि डोळे लहान दिसतात? पाहा कशामुळे चेहऱ्यावर जमा होतो पफीनेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2025 17:17 IST

सकाळी उठल्या-उठल्या चेहरा सुजलेला दिसतो. झोपेतून उठल्यावर काही मिनिटांसाठी किंवा तासभरासाठी चेहरा असा मलूल दिसणे अगदी सामान्य आहे. चेहऱ्याची ...

सकाळी उठल्या-उठल्या चेहरा सुजलेला दिसतो. झोपेतून उठल्यावर काही मिनिटांसाठी किंवा तासभरासाठी चेहरा असा मलूल दिसणे अगदी सामान्य आहे. चेहऱ्याची सूज काही वेळात उतरते. मात्र का जणांचा चेहरा तसाच राहतो. उठून बराच वेळ झाला तरी सुज कमी होत नाही. असे झाल्यास चेहरा प्रसन्न वाटत नाही. आळसावलेला वाटतो. तसेच फुगतो आणि तसाच राहतो. असे होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. झोपेमुळे असे होतेच. मात्र पफीनेस कमी होत नसेल तर कारणं वेगळी असू शकतात. 

१. कामामुळे, अति चिंता केल्यामुळे, मोबाइलमुळे जर झोप लागत नसेल तर त्याचे परिणाम शरीरावर होतातच. शरीराला सलग किमान सात ते आठ तासाची झोप फार गरजेची असते. जर तेवढी झोप नियमित मिळाली नाही तर चेहरा सुजलेला दिसतो. डोळ्यांखाली काळपट तर होतेच. मात्र त्वचाही फुगल्यासारखी दिसते. चेहरा फार विचित्र दिसतो. त्यामुळे झोप योग्य घ्या. रात्री वेळेत झोपा. जर झोपण्यापूर्वी मोबाइल हातात घेत असाल तर ती सवय अत्यंत वाईट आहे. तसे न करता डोळे बंद करायचे आणि पडून राहायचे. 

२. आहार चांगला नसेल तरी सुज येते. शरीराला गरजेचे असलेले पोषण मिळाले नाही तर चेहर्‍यावर ते दिसून येते. जेवणाची वेळ चुकत असेल किंवा आहार अनियमित असे तरी लगेच त्रास होतो. त्यामुळे योग्य पोषक आहारच घ्यायचा. ताटात सगळ्या गुणधर्मांचे पदार्थ असावेत. 

३. दिवसातून पाणी किती पिता? शरीराला गरजेची असलेली पाण्याची पातळी वर खाली झाल्यावर लगेच चेहरा सुजतो. त्यामुळे पाणी पित राहायचे. पाण्याची कमतरता उद्भवणारचं नाही जर तुम्ही पाण्याची पातळी वाढवणारे अन्न खाल्ले आणि पाणी प्यायले. सध्या हे कारण अगदी सामान्य आहे.  

४. जर कशाची अॅलर्जी असेल तरी चेहरा सुजतो. काही खाण्यात आले किंवा चुकून हात लागला तरी चेहरा लगेच फुगायला लागतो.   

सगळ्यात मस्त उपाय म्हणजे फक्त गार पाण्याने तोंड धुत राहणे. बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवायचा. काकडीचे तुकडे चेहर्‍यावर ठेवायचे. फक्त पाणी लावल्यावर चेहरा सुंदर दिसतो आणि सुज गायब होते.    

टॅग्स :त्वचेची काळजीहेल्थ टिप्सहोम रेमेडीमहिला