Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर चेहरा तेलकट-चिपचिपा दिसतो? ४ सवयी बदला, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक

उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर चेहरा तेलकट-चिपचिपा दिसतो? ४ सवयी बदला, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक

Does your face look oily and sticky all year round? then Change 4 habits : चेहरा सारखा तेलकट होतो का? मग पाहा काय चुकते आहे. जाणून घ्या घरगुती उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 13:20 IST2025-04-25T13:19:17+5:302025-04-25T13:20:19+5:30

Does your face look oily and sticky all year round? then Change 4 habits : चेहरा सारखा तेलकट होतो का? मग पाहा काय चुकते आहे. जाणून घ्या घरगुती उपाय.

Does your face look oily and sticky all year round? then Change 4 habits | उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर चेहरा तेलकट-चिपचिपा दिसतो? ४ सवयी बदला, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक

उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर चेहरा तेलकट-चिपचिपा दिसतो? ४ सवयी बदला, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक

उन्हाळ्यामध्ये शरीर नुसते घामाने भिजलेले असते. कपडे सारखे ओले होतात. ज्यांना घाम कमी येतो त्यांची त्वचा कोरडी पडते. (Does your face look oily and sticky all year round? then Change 4 habits)पांढरे डाग चेहर्‍यावर उठतात. काही ना काही त्रास प्रत्येकालाच होत असतो. मात्र एक फार कॉमन वैतागवाणी समस्या म्हणजे तेलकट चेहरा. उन्हाळा असो हिवाळा असो वा पावसाळा चेहरा सारखा तेलकट होतो. तेलकट त्वचेवर धूळ मातीही चेहऱ्यावर बसते. चिकटून राहते. त्यामुळे खाज सुटते. तेलकट त्वचेवर पिंपल्स तसेच पुरळ जास्त उठते. (Does your face look oily and sticky all year round? then Change 4 habits)त्यामुळे अशा त्वचेसाठी काहीतरी उपाय करायला हवेत म्हणून आपण बरीच प्रॉडक्ट्स वापरतो मात्र सरते शेवटी चेहरा तेलकट होतोच. 

चेहर्‍याला सुटणारं तेल बंद करणं शक्य नाही. मात्र त्याचा त्रास होणार नाही तसेच त्याचे प्रमाण कमी होईल यासाठी काही उपाय करणे नक्कीच शक्य आहे. काही साध्या स्टेप्स फॉलो करुन चेहर्‍याचा तेलकटपणा कमी करता येतो. 

१. झोलीस्किन क्लिनिक तसेच डॉ. आंचल या विषयतज्ज्ञ सांगतात, चेहरा तेलकट झाला की तो चिपचिपित लागतो. त्यामुळे चेहरा तेलकट झाल्यावर लोक चेहरा सारखा धुतात. दिवसातून अनेकदा चेहरा धुतात. मात्र चेहरा सारखा धुतल्याने त्याला आणखी तेल सुटते किंवा मग चेहरा कोरडा पडतो. त्यामुळे दिवसातून २ ते ३ वेळाच चेहरा धुवा. बाकीच्या वेळी रुमालाने पुसा. किंवा मॉयश्चराईझर लावा. 

२. पाणी भरपूर प्या. त्वचेच्या समस्यांचे एक कारण असते पाणी कमी पिणे. जसे शरीराला पाणी गरजेचे असते तसेच त्वचेसाठीही पाणी गरजेचे असते. पाण्यामध्ये लिंबू पिळा. तसेच तुळशीचे पाणी प्या. चेहऱ्याला गुलाब पाणी लावा. गुलाब पाण्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. 

३. डॉ. आंचल सांगतात चेहऱ्याला बेसनाचा मास्क लावणे फार चांगले आहे. मात्र जर तुमची त्वचा ऑयली आहे तर मग बेसनामुळे तेलकटपणा आणखी वाढू शकतो. सगळ्यांची त्वचा वेगळी असते. काहींना बेसन सुट करते तर काहींना नाही. तेलकट त्वचा असेल तर बेसनाऐवजी मुलतानी मातीचा मास्क लावा. मुलतानी माती तेलकटपणा कमी करते. त्वचा मऊ मुलायम होते. 

४. तेलकट त्वचेसाठी तुरटी फायदेशीर ठरते. तुरटी छान उगाळून चेहऱ्याला लावा. त्यामध्ये मुलतानी माती मिक्स करुन माक्सही तयार करु शकता. चेहर्‍याचा तेलकटपणा कमी होतो.       

Web Title: Does your face look oily and sticky all year round? then Change 4 habits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.