Lokmat Sakhi >Beauty > चेहरा सारखा पांढराफटक दिसतो ? त्वचा पांढरी पडून खाज सुटते? ५ उपाय, लगेच मिळेल आराम

चेहरा सारखा पांढराफटक दिसतो ? त्वचा पांढरी पडून खाज सुटते? ५ उपाय, लगेच मिळेल आराम

Does your face have white spots? Does your skin turn white and itch always? 5 remedies, you will get immediate relief : त्वचेवरील पांढरे डाग वाढण्यामागे असतात अनेक कारणे. पाहा कोणते उपाय ठरतात प्रभावी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2025 14:08 IST2025-08-17T14:07:01+5:302025-08-17T14:08:44+5:30

Does your face have white spots? Does your skin turn white and itch always? 5 remedies, you will get immediate relief : त्वचेवरील पांढरे डाग वाढण्यामागे असतात अनेक कारणे. पाहा कोणते उपाय ठरतात प्रभावी.

Does your face have white spots? Does your skin turn white and itch always? 5 remedies, you will get immediate relief | चेहरा सारखा पांढराफटक दिसतो ? त्वचा पांढरी पडून खाज सुटते? ५ उपाय, लगेच मिळेल आराम

चेहरा सारखा पांढराफटक दिसतो ? त्वचा पांढरी पडून खाज सुटते? ५ उपाय, लगेच मिळेल आराम

विविध कारणांमुळे चेहऱ्याला टॅनिंग होणे तसेच मुरुम, पिंपल्स सारखे त्रास अगदी सामान्य आहेत. मात्र त्वचेवर पांढरे डाग दिसायला लागले आणि त्यांना खाज सुटत असेल तर मग त्यामागे विविध कारणे असू शकतात. (Does your face have white spots? Does your skin turn white and itch always? 5 remedies, you will get immediate relief)त्याकडे दुर्लक्ष अजिबात करु नका. चेहर्‍यावर वारंवार पांढरे डाग दिसणे ही अनेकां त्रासदायक ठरणारी समस्या आहे.  काही वेळा त्वचा अत्यंत कोरडी पडल्यामुळे हे डाग दिसू लागतात, तर काही वेळा ऍलर्जी किंवा बुरशीजन्य संसर्गामुळे ही समस्या वाढते. 

उन्हाळ्यात जास्त ऊन लागल्याने असे होते. हिवाळ्यात थंड वारा लागल्याने त्वचा पांढरी पडते. साबणामुळेही त्वचेवर असे डाग दिसतात. चुकीच्या साबणाचा वापर केल्यामुळे त्वचा लवकर खराब होते. अगदी कोरडी पडते. त्यामुळे सतत साबण व फेसवॉशने चेहरा धुतल्याने त्वचा नैसर्गिक ओलावा गमावते आणि त्यावर पांढरे ठिपके दिसतात. साबणाचा अति वापर टाळा. काही ब्यूटी प्रॉडक्ट्समधील रसायनांमुळेही त्वचेला त्रास होऊन असे डाग तयार होतात. त्वचा अति सुंदर दिसावी म्हणून आपण असे प्रॉडक्ट्स वापरतो मात्र त्याचा परिणाम जर उलटा झाला तर त्रास वाढतो. अन्नातील काही घटकांची ऍलर्जी असेल तर त्याची रियाक्शन म्हणून असे डाग येतात. परफ्युम्स किंवा वातावरणातील धूळीचे कण यामुळेही चेहर्‍यावर लहान लहान पांढरे डाग दिसू शकतात.बरेचदा जीवनसत्त्वांची कमतरता असल्यामुळे त्वचा खराब होते. जीवनसत्त्व डी तसेच बी१२ आणि कॅल्शियमची कमतरता असली तरी त्वचेतील रंगद्रव्य नीट कार्य करत नाही आणि त्यातून ही समस्या वाढते.

यावर काही सोपे घरगुती उपाय नक्की मदत करू शकतात. 
१. रोज चेहरा धुतल्यानंतर थोडे गुलाबपाणी किंवा काकडीचा रस लावल्याने त्वचा थंडावते आणि ओलावा टिकून राहतो. 
२. खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल रात्री झोपण्यापूर्वी हलके मसाज करून लावल्यास कोरडेपणा कमी होतो आणि डाग फिके पडतात. 
३. ताज्या हळदीचा लेप किंवा हळद व दुधाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानेही त्वचा स्वच्छ व उजळ दिसते.


४. कोरफडीचा वापर केल्यास त्वचेवरील खाज कमी होते. डाग हळूहळू कमी होतात.
५. आहारात हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा व दूध यांचा समावेश करून आवश्यक जीवनसत्त्वे मिळवणेही अत्यंत गरजेचे आहे. मात्र हे डाग सतत वाढत असतील, खाज किंवा लालसरपणा जाणवत असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य काळजी आणि नैसर्गिक उपाय यांच्या साहाय्याने ही समस्या नक्कीच कमी करता येते.

Web Title: Does your face have white spots? Does your skin turn white and itch always? 5 remedies, you will get immediate relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.