Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > डबल चीनमुळे चेहरा दिसतो सुजलेला - जाडजूड? पाहा हनुवटीभोवती साचलेली चरबी कमी करण्यासाठी उपाय

डबल चीनमुळे चेहरा दिसतो सुजलेला - जाडजूड? पाहा हनुवटीभोवती साचलेली चरबी कमी करण्यासाठी उपाय

Does double chin make your face look puffy and fat? See the solution to reduce fat accumulated around the chin : डबल चीन कमी करण्यासाठी अगदी सोपे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2026 20:10 IST2026-02-15T20:07:04+5:302026-02-15T20:10:45+5:30

Does double chin make your face look puffy and fat? See the solution to reduce fat accumulated around the chin : डबल चीन कमी करण्यासाठी अगदी सोपे उपाय.

Does double chin make your face look puffy and fat? See the solution to reduce fat accumulated around the chin | डबल चीनमुळे चेहरा दिसतो सुजलेला - जाडजूड? पाहा हनुवटीभोवती साचलेली चरबी कमी करण्यासाठी उपाय

डबल चीनमुळे चेहरा दिसतो सुजलेला - जाडजूड? पाहा हनुवटीभोवती साचलेली चरबी कमी करण्यासाठी उपाय

चेहर्‍याचा आकार कितीही सुंदर असला तरी हनुवटीखाली साचलेली अतिरिक्त चरबी म्हणजेच डबल चीन अनेकांना त्रासदायक वाटते. फोटो काढताना किंवा आरशात पाहताना चेहरा जड दिसतो आणि आत्मविश्वासावरही परिणाम होतो. डबल चिन ही केवळ सौंदर्याची समस्या नसून काही वेळा जीवनशैलीशी संबंधित असते. त्यामुळे ती का वाढते आणि ती कमी करण्यासाठी काय करता येईल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

डबल चिन वाढण्याची कारणे विविध असू शकतात. सर्वात सामान्य कारण म्हणजे वजन वाढणे. शरीरात चरबी वाढली की ती हनुवटीखालीही साचते. मात्र फक्त जाड व्यक्तींनाच डबल चिन होते असे नाही. चुकीची बसण्याची किंवा मोबाइल वापरताना मान खाली झुकवून ठेवण्याची सवयही कारणीभूत ठरते. यामुळे मान आणि हनुवटीभोवतीचे स्नायू सैल होतात. वयानुसार त्वचेची लवचिकता कमी होते, कोलेजन घटते आणि त्वचा सैल पडते. अनुवंशिक कारणेही काही वेळा जबाबदार असू शकतात. डबल चिन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास शरीरातील एकूण चरबी कमी होते आणि त्याचा परिणाम हनुवटीवरही दिसतो. जास्त साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जंक फूड टाळणे गरजेचे आहे.

मान आणि हनुवटीचे काही सोपे व्यायामही उपयोगी ठरतात. छताकडे पाहून ओठ पुढे करून किस करण्यासारखी हालचाल करणे, जीभ शक्य तितकी बाहेर काढून काही सेकंद ठेवणे किंवा तोंड बंद ठेवून हनुवटी वर उचलण्याचे व्यायाम केल्याने त्या भागातील स्नायू ताणले जातात आणि घट्ट होण्यास मदत होते. हे व्यायाम दररोज काही मिनिटे नियमित केल्यास हळूहळू फरक जाणवू शकतो. योग्य पोश्चर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बसताना आणि चालताना पाठ सरळ ठेवणे, मोबाइल डोळ्यांच्या लेवलवर धरुन वापरणे यामुळे मानेला अनावश्यक ताण येत नाही. यामुळे त्वचा सैल पडण्याची शक्यता कमी होते.

पुरेसे पाणी पिणे आणि त्वचेची योग्य काळजी घेणेही आवश्यक आहे. त्वचा हायड्रेट राहिली की तिची लवचिकता टिकून राहते. काहीजण मान आणि हनुवटीभोवती मसाज करतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. मात्र कोणतेही क्रीम किंवा घरगुती उपाय चमत्कारिक परिणाम देतात असा समज ठेवू नये, सातत्य आणि संयम महत्त्वाचा आहे.
जर डबल चिन खूपच जास्त असेल आणि व्यायामाने फरक पडत नसेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील पर्यायांचा विचार करता येतो. परंतु बहुतेक वेळा योग्य आहार, व्यायाम आणि चांगली जीवनशैली यामुळेच सुधारणा दिसून येते.
 

Web Title : डबल चिन कम करें: कारण, व्यायाम और जीवनशैली के उपाय जानें

Web Summary : डबल चिन वजन बढ़ने, गलत मुद्रा या आनुवंशिकी के कारण होती है। आहार और व्यायाम से वजन नियंत्रित करें। ठोड़ी के व्यायाम करें, सही मुद्रा बनाए रखें, हाइड्रेटेड रहें और मालिश करें। जरूरत पड़ने पर विशेषज्ञों से सलाह लें; जीवनशैली में बदलाव से अक्सर मदद मिलती है।

Web Title : Reduce Double Chin: Causes, Exercises, and Lifestyle Tips Revealed

Web Summary : Double chin is caused by weight gain, poor posture, or genetics. Control weight through diet and exercise. Try chin exercises, maintain good posture, hydrate, and massage. Consult experts if needed; lifestyle changes often help.