Join us
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी उठल्यानंतर चेहरा सुजलेला दिसतो? डॉक्टर सांगतात १ उपाय, १० दिवसांत कमी होईल सूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 23:10 IST

Doctors Suggests 3 Simple Steps To Reduce Puffy Face : रोज ३० ते ४० मिनिटं वॉक करा. ज्यामुळे शरीराचं ब्लड सर्क्युलेशन चांगले राहील.

अनेकांना तक्रार असते की चेहरा सुजलेला दिसत किंवा चेहऱ्यावर ग्लो नसतो चेहऱ्यावर पफिनेस दिसत आहे. खासकरून महिलांना अशी तक्रार असते. तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल, चेहऱ्यावर सतत थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांनी सांगितलेले ३  उपाय करून पाहायला हवेत. (Doctors Suggests 3 Simple Steps To Reduce Puffy Face)

डॉक्टर रेड्डी सांगतात की जास्त मीठ खाल्ल्यानं खासकरून पॅकेज्ड फूडमध्ये असलेल्या सोडियममुळे शरीरातलं पाणी शोषून घेतलं जातं. याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसून येतो गाल मोठे दिसतात आणि डोळे लहान दिसतात आणि जॉ लाइनसुद्धा गायब होते. ज्यामुळे झोप न येणं, ताण-तणाव या समस्या वाढतात. १० दिवसांत चेहर्‍याची सूज कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता.

 डर्मेटोलॉजिस्ट सांगतात की सगळ्यात आधी  १० दिवसांसाठी लोणची, इंस्टंट न्युडल्स, रेडी टू इट फूड, बिस्किट्स पॅकेज्ड फूड  खाणं पूर्णपणे बंद करा. या ऐवजी हेल्दी, घरी केलेलं ताजं अन्न खाण्यास प्राधान्य द्या  ज्यामुळे १० दिवसांत चेहर्‍याची सूज कमी होण्यास मदत होईल. चांगली झोप  घेणं शरीरातील कॉर्टिसोल कमी करण्यासाठी गरजेचं असतं. डॉक्टर सांगतात की रोज रात्री जवळपास साडे दहाला झोपण्याची सवय ठेवा. ज्यामुळे शरीराची स्ट्रेस लेव्हल कमी होते. चेहऱ्याचा पफीनेस कमी होतो. झोप जितकी चांगली होईल तितकाच चेहरा फ्रेश दिसेल.

रोज ३० ते ४० मिनिटं वॉक करा. ज्यामुळे शरीराचं ब्लड सर्क्युलेशन चांगले राहील. कॉर्टिसोल कमी होईल आणि शरीरात जमा झालेलं अतिरिक्त पाणी बाहेर निघण्यास मदत होईल. याशिवाय वॉक केल्यानं शरीराची सूज हळूहळू कमी होईल आणि त्वचा हेल्दी दिसेल. रोज  या ३ गोष्टी केल्यानं १० दिवसांत तुमचा चेहरा हेल्दी आणि ग्लोईंग दिसेल. याशिवाय पिंपल्स कमी होऊन चेहरा स्वच्छ दिसेल.

चेहऱ्याला मॉईश्चरायजर आणि सनस्क्रीन कंटिन्यू लावा.  ज्यामुळे त्वचेचा पोत चांगला राहण्यास मदत होते.  तसंच गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा. ज्यामुळे चेहऱ्याची अतिरिक्त चरबी वाढत नाही आणि वजनही कमी राहते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Reduce face swelling in 10 days: Doctor's simple tips.

Web Summary : Doctors suggest reducing salt, prioritizing sleep, and walking daily to decrease facial swelling. Avoid packaged foods and late nights. Regular moisturizing and sunscreen use helps maintain healthy, glowing skin in ten days.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी