Skin Care: चेहऱ्यावर केस (Facial Hair) येणं ही एक कॉमन समस्या आहे. हे केस दूर करण्यासाठी महिला आणि तरूणी वेगवेगळे उपायही करतात. हार्मोनल बदलामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हे केस येतात. ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचं सौंदर्य बिघडतं. अशात कधी प्लकर, रेझर, हेअर रिमूव्हल क्रीम किंवा व्हॅक्सचा वापर केला जातो. पण हे चेहऱ्यावर येणारे केस नॅचरल पद्धतीनंही रोखले जाऊ शकतात. डॉक्टर अखिला जोशी यांनी याबाबत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय आणि चेहऱ्यावरील केस घालवण्याचा उपायही सांगितला आहे.
चेहऱ्यावरील केस घालवण्याचा उपाय
डॉक्टरांनी सांगितलं की, लाइफस्टाईलमध्ये एक बदल करून चेहऱ्यावर उगवणारे लांब केस नेहमीसाठी दूर केले जाऊ शकतात. त्या सांगतात की, त्यांच्याकडे एक पेशंट आली होती. या महिलेने चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वेगवेगळे उपाय केले होते. पण त्यांचा फारसा काही फायदा दिसला नाही. पण जेव्हा तिने लाइफस्टाईलमध्ये बदल केला तेव्हा केस उगवणं बंद झालेत. या पेशंटच्या चेहऱ्यावर केस उगवण्याची कारणं इन्सुलिन रेजिस्टेन्स आणि हाय अॅड्रोजन लेव्हल्स होती.
अशात महिलेने खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करून ब्लड शुगर लेव्हल बॅलन्स करण्यावर फोकस केलं. त्याशिवाय त्यांना मुव्हमेंट करण्यास सांगण्यात आलं आणि पुरेसा आराम करण्याचा देखील सल्ला देण्यात आला. हे बदल केल्यावर आणि कोणतीही औषधं न घेता रूग्णाच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांमध्ये बदल दिसून आला. पुढील दोन महिन्यात चेहऱ्यावर केस येणे कमी झालेत.
चेहऱ्यावरील केस काढावेत का?
चेहऱ्यावर केस येणं ही एक नॅचरल प्रोसेस असते आणि हे केस काढणंही पुर्णपणे नॉर्मल असतं. हे केस काढण्यासाठी तरूणी किंवा महिला वेगवेगळे उपाय करतात. पण केस काढण्याची पद्धत योग्य असावी हे महत्वाचं आहे. जेणेकरून त्वचेचं नुकसान होऊ नये.