Bad Habits for Skin : कमी वयात कुणालाही म्हातारं दिसावं असं वाटणार नाही. 30 वयातच तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या याव्या किंवा हाडांमध्ये वेदना व्हाव्या असंही वाटणार नाही. पण चुकीच्या लाइफस्टाईलमुळे चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात. कळत-नकळत आपल्याकडून अशा काही चुका होतात, ज्याचा प्रभाव आपल्या त्वचेवर दिसतो आणि तुम्ही कमी वयातच म्हातारे दिसू लागता. डॉ. ऋता यांनी अशाच काही चुकीच्या सवयींबाबत माहिती दिली आहे. डॉ. ऋता स्किन आणि डाएट स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी कमी वयात म्हातारे दिसण्यासाठी कोणत्या चुका कारणीभूत ठरतात. याबाबत इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
वेळेआधीच म्हातारं करणाऱ्या सवयी
कधीच व्यायाम न करणे
तुम्ही जर रोज व्यायाम करू शकत नसाल तर किमान आठवड्यातून 45 मिनिटं तरी व्यायाम करणं गरजेचं असतं. जर कुणाचं जीवन एकदम आरामदायक असेल आणि व्यक्ती कोणतीही अॅक्टिविटी करत नसेल तर त्या व्यक्तीचं शरीर वेळेआधीच म्हातारं होतं. अशात शरीरात वेगवेगळे आजारही घर करतात.
नेहमीच तणावात राहणे
तणाव आणि एंझायटीमुळे व्यक्तीचं मानसिक रूपानं नुकसान होतं आणि शरीरही प्रभावित होतं. अशात तणाव कमी करण्यावर भर दिला पाहिजे. तणाव कमी करण्यासाठी ब्रीदिंग एक्सरसाइज करू शकता. तुमच्या आवडती गाणी ऐका, बाहेर वॉक करा किंवा आवडीतं कामं करा. ज्यामुळे तुमचा तणाव कमी होईल.
नेहमीच रागात राहणे
नेहमीच रागात राहिल्यानं मूड तर खराब होतो, सोबततच आरोग्यही बिघडतं. अशात राग कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्त रागामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोकाही असतो. याचा मेंदुवरही नकारात्मक प्रभाव पडतो. नेहमीच रागामुळे व्यक्ती कमी वयातच म्हातारा दिसू लागतो.
कमी पाणी पिणे
शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया योग्यपणे होण्यासाठी पाण्याची गरज असते. पाणी जर कमी पित असाल डिहायड्रेशन होतं. तसेच त्वचा कमी वयातच म्हातारी दिसू लागते. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यावं. दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लीटर पाणी प्यावं.
नेहमीच कमी आणि उशीरा झोपणं
तुम्ही जर कमी झोपत असाल किंवा नेहमीच उशीरा झोपत असाल तर याचा त्वचेवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे रोज झोपण्याची वेळ फिक्स ठेवा आणि पुरेशी झोप घ्या. रोज किमान 7 ते 8 तासांची झोप घ्यायला हवी.