Teeth Whitening: मोत्यांसारखे चमकदार दात सगळ्यांनाच हवे असतात. पण वेगवेगळ्या कारणांनी दातांवर पिवळेपणा येतो. दातांवर पिवळेपणा आल्यानं आत्मविश्वासही कमी होतो आणि चार चौघात मोकळेपणानं हसणंही जमत नाही. दातांचा पिवळेपणा लपवण्यासाठी सतत तोंडावर हात ठेवून हसावं लागतं. अशात दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक महागडे उपाय केले जातात. पण महागडे उपाय न करताही तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता.
पिवळेपणा दूर करण्याचा उपाय
पिवळेपणा दूर करून दात पुन्हा चमकदार करण्यासाठी अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी एक उपाय सांगितला आहे. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओत सांगितलं की, दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी दोन गोष्टींची एक पेस्ट फायदेशी ठरेल. या दोन गोष्टी म्हणजे बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइड. हा उपाय करण्यासाठी बेकिंग सोडा आणि 2% ग्रेड असलेलं हायड्रोजन पॅरोक्साइड घ्यायचं आहे.
कसा होईल फायदा
डॉ. बर्ग यांनी सांगितलं की, 'बेकिंग सोडा तोंडातील अॅसिड न्यूट्रलाइज करण्यास मदत करतो. तर हायड्रोजन पॅरोक्साइड दात पांढरे करण्यासाठी अॅक्टिव तत्वासारखं काम करतं. बेकिंग सोड्यानं दातांवरील पिवळे डाग दूर होतात आणि दात चमकदार होतात.
हेल्थलाइनच्या एका रिपोर्टनुसार, हायड्रोजन पॅरॉक्साइड दात चमकदार करण्यासाठी एक चांगला उपाय आहे. मात्र हे योग्य पद्धतीनं वापरलं गेलं पहिजे. दात चमकदार करण्यासाठी 3% पेक्षा जास्त ग्रेडचं हायड्रोजन पॅरॉक्साइड घेऊ नये. जर जास्त ग्रेडचं हायड्रोजन पॅरॉक्साइड घेतलं तर दातांच्या वरचा थर डॅमेज होतो.
कशी बनवाल पेस्ट?
एका छोट्या वाटीमध्ये बेकिंग सोडा टाका. यात थोडं थोडं करून हायड्रोजन पॅरॉक्साइड टाका आणि थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पोस्ट टूथब्रशच्या मदतीनं दातांवर लावा आणि 2 मिनिटं तशीच राहू द्या. नंतर पाण्यानं गुरळा करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून केवळ 2 किंवा 3 वेळाच करा. जास्त वेळ कराल तर दात कमजोर होऊ शकतात.