Easy Way To Remove Tanning : उन्हाळ्यातील प्रखर उन्हामुळे त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. यातीलच एक मोठी समस्या म्हणजे टॅनिंग. उन्हामुळे त्वचा काळवंडते. टॅनिंगमुळे त्वचेचा (Body Tan) रंगच बदलून जातो. सोबतच त्वचेची चमकही दूर होते. टॅनिंग जर जास्तच वाढली तर त्वचेवर मळ दिसू लागतो. तुम्हीही टॅनिंगनं हैराण असाल आणि यावर सोपा काही उपाय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी खास उपाय घेऊन आलो आहोत.
डर्मेटोलॉजिस्ट निरुपमा परवंदा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत टॅनिंग दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहे. डॉक्टर म्हणाल्या की, तत्वेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्हाला केवळ दोन गोष्टी करायच्या आहेत. २ स्टेपचं रूटीन फॉलो करून तुम्ही टॅनिंग दूर करू शकता.
सन्सक्रीन
डर्मेटोलॉजिस्टनी सगळ्याआधी रोज सन्सस्क्रीन लावण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरनुसार, सन्सक्रीन लावल्यानं त्वचेवर टॅनिंग होणार नाही. यासाठी लोशन बेस्ड चांगलं सनस्क्रीन लावावं. हे त्वचेवर चांगल्या पद्धतीनं पसरतं. SPF 50 ब्रॉड स्पेक्ट्रम सन्सक्रीन चांगलं मानलं जातं. हे UVA आणि UVB दोन्हीपासून त्वचेची सुरक्षा करतं. तसेच टॅनिंग रोखण्यास मदत मिळते.
एक्सफोलिएशन
डॉक्टर म्हणाल्या की, 'टॅनिंग दूर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की, त्वचेची खोलवर स्वच्छता करावी आणि डेड स्किन सेल्स दूर करावे. रात्री त्वचेला नियमितपणे एक्सफोलिएट केल्यानं टॅनिंगची समस्या दूर होण्यास मदत मिळते. यासाठी ग्लायकोलिक अॅसिड (Glycolic acid) किंवा AHA-BHA लोशन लावू शकता'.
या दोन गोष्टी नियमितपणे फॉलो केल्या तर त्वचेवर टॅनिंग होणार नाही आणि झालेलं टॅनिंग दूर होण्यास मदत मिळेल. तसेच त्वचा नेहमीच मुलायम, तजेलदार आणि ग्लोईंग दिसेल.