Blackheads Removal Home Remedies: ब्लॅकहेड्स ही एक अशी समस्या आहे जी चेहऱ्याचं सौंदर्य कमी करते. अनेक वेळा विविध उपाय करूनही या हट्टी ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळत नाही. खासकरून नाक, हनुवटी आणि कपाळावर दिसणारे हे काळे ठिपके त्वचेचा उजाळा कमी करतात. काही लोक तर महागडे ट्रीटमेंट्स करूनही थोडा फारच फरक दिसतो. अशा वेळी योगगुरू आणि प्रसिद्ध डॉक्टर हंसा जी यांनी सांगितलेले काही घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात.
हट्टी ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवण्याचे उपाय
बेकिंग सोडा
डॉ. हंसा जी सांगतात की बेकिंग सोडा नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करतो. एक चमचा बेकिंग सोडामध्ये दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. बेकिंग सोडा त्वचेचा pH संतुलन राखतो आणि डेड स्किन व घाण दूर करतो.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये व्हिटामिन A आणि C भरपूर प्रमाणात असतं. तेलकट त्वचेसाठी टोमॅटो फायदेशीर आहे. टोमॅटोचे गोल काप करून ते ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर हलके घासा. काही वेळानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचा ताजी, स्वच्छ आणि निरोगी होते.
स्टीम म्हणजेच वाफ
डॉ. हंसा जींच्या मते, वाफ घेणे हे सर्वात प्रभावी उपाय आहे. स्टीममुळे त्वचेचे बंद पोर्स उघडले जातात आणि त्यातील घाण बाहेर पडते. यामुळे ब्लॅकहेड्स मऊ होतात आणि सहजपणे काढता येतात.
लिंबू, मध आणि साखर
हाही घरगुती उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. हा करण्यासाठी दोन चमचे मध, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा साखर एकत्र मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. लिंबातील सिट्रिक अॅसिड पोर्स स्वच्छ करतं, मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि साखर स्क्रब म्हणून काम करते.